Thackeray Shinde Yuti : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोलापुरात शिवसेनांची महाआघाडी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि शिंदे गटातील शिवसेना (Thackeray Shinde Yuti ) एकत्र आल्या आहेत. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आली आहे.ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्त्यांना मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या (Thackeray Shinde Yuti) अनपेक्षित राजकीय समीकरणामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Zilla Parishad Solapur मुंबई महापौर निवडणूक लांबणीवर दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवड पुढे ढकलण्यात आली आहे. महापौर (Mayor ) पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असली तरी भाजप आणि शिंदे गटाने अद्याप कोकण आयुक्तांकडे गटनोंदणी न केल्याने नियोजित मतदान होऊ शकले नाही. त्यामुळे महापौर निवडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. नाशिक महापौराबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय? सूत्रांच्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानंतर नाशिक महापौराचा निर्णय होण्याची शक्यता आहे. नाशिक महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय थेट मुख्यमंत्री घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय युती, महापौर निवडीतील अनिश्चितता आणि राज्यभरातील गुन्हेगारी घटना यामुळे महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं दिसत आहे. येत्या काही दिवसांत राजकीय चित्र आणखी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.