Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीच्या (Madhuri Elephant) बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. माधुरी हत्तीणीला नांदणी मठात आणण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. उच्चाधिकार समितीसमोर आज मुंबईत सुनावणी झाली. या सुनावणीत मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. निर्देशानुसार उच्चस्तरीय समितीकडून डॉक्टर मनोहरण यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी समितीने माधुरीच्या एकंदरीत आरोग्याबाबत समाधानकारक अहवाल सादर केला. तसेच नांदणी मठाचे माहुत आणि माधुरी हत्तीणीचं असलेलं नातं यावेळी अधोरेखित करण्यात आले अशी माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली. समाधानकारक अहवाल सादर पुनर्वसन केंद्राच्या बांधकामास 7 टप्प्यात मंजुरी देण्यात आली तसेच 12 कोटीचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. माधुरी आणि माहूत यांच्या नातेसंबंधाबद्दलही सुनावणीत महत्वपूर्ण चर्चा झाली. माधुरीच्या आरोग्याबाबत सुनावणीत सकारात्मक माहिती देण्यात आली. या सुनावणीत माधुरी हत्तीणीच्या संदर्भात नियुक्त केलेल्या समतीने समाधानकारक अहवाल सादर केला. वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी माधुरी हत्तीणीच्या बाबतीमध्ये एकूण समाधानकारक अहवालाच्या आधारे पुन्हा एकदा एक तपासणी करण्याचे ठरलं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच एचपीसी, न्यायमूर्ती वर्मा यांच्याकडून नांदणी मठ संस्थान वनतारा आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जो संयुक्त प्रस्ताव करण्यात आला होता त्या पुनर्वसन केंद्राच्या उभारणीच्या बाबतीमध्ये बांधकाम पूर्वपरवानगी देण्यात आली असल्याची माहिती नांदणी मठाचे वकील मनोज पाटील यांनी दिली. सुनावणीवर सर्व पक्षकांराकडून समाधान व्यक्त माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये आजच्या झालेल्या सुनावणीनंतर जागेवरील प्रत्यक्ष कामकाजासाठी आता सकारात्मकता निर्माण झाल्याने त्याबाबतीमध्ये आवश्यकता परवानगी देण्याची कार्यवाही भूमिका एचपीसीकडून घेण्यात आली आहे. झालेल्या सुनावणीवर सर्व पक्षकांरानी समाधान व्यक्त केले आहे.