Anjali Damania Vs Rupali Chakankar: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले. यातच आता पार्थ पवार हे जमीन घोटाळाप्रकरणी निर्दोष असल्याचं खारगे समितीनं म्हटले. मात्र हा अहवाल फेटाळत अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर पुन्हा आरोप केले. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. या विरोधात आता थेट अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. रूपाली चाकणकर म्हणाल्या, अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजामध्ये किती खालच्या पातळीची विकृती असू शकते. एखाद्या व्यक्तीला आणि एका कुटुंबाला अंजली दमानिया सातत्याने बदनाम करत असतात. यापूर्वी देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर अनेक आरोप केले, पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावरती आरोप करत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे असे चाकणकर म्हणाल्या. Parth Pawar त्या कुटुंबाने आपला घरातला व्यक्ती गमावला आहे आणि… एखाद्या व्यक्तीला आणि एका कुटुंबाला अंजली दमानिया सातत्याने बदनाम करत असतात. यापूर्वी देखील अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर अनेक आरोप केले, पण त्यातला कुठलाही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावरती आरोप करत आहेत. ही अतिशय घाणेरडी मानसिकता आहे. Anjali Damania Vs Rupali Chakankar | Pune News : सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर! विभावरी देशपांडे, किशोरी पेडणेकरांना ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार प्रदान त्या कुटुंबाने आपला घरातला व्यक्ती गमावला आहे आणि सबंध महाराष्ट्र त्याबाबत हळहळ व्यक्त करत आहे. हे नीच पातळीचे आणि किळसवाण विधान आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितले. Anjali Damania Vs Rupali Chakankar अंजली दमानिया काय म्हणाल्या? पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी खारगे समितीतर्फे पार्थ पवार यांना कोणतीही क्लिन चीट मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या की, ‘मुंढवा जमीन घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवार यांना खारगे समितीनं कोणतीच क्लिन चीट दिलेली नाही. अजून समितीची शेवटची बैठक बाकी आहे. याविषयी माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत. पार्थ पवार यांचं नाव एफआयआरमध्ये का नाही याविषयी आमचा लढा असून, कोणत्याही न्यायात सहानुभूतीचं कार्ड चालत नाही. हा जो घोटाळा पार्थ पवार यांनी केला आहे, त्यातून ते सुटणं शक्यच नाही.” हेही वाचा: Pune Election 2026 : जाहीर प्रचार संपला, आता रात्रीचा ‘गनिमी कावा’; जिल्हा परिषदेसाठी छुप्या हालचालींना वेग