Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीजवळील विमान अपघातात निधन झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाला धक्कादायक आणि स्वीकारण्यास कठीण असल्याचे म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले कि, “डोकं खूप सुन्न झालं आहे. विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जीवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे… हे इतकं धक्कादायक की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे…. अंजली दमानिया यांनी अजित पवार (Ajit Pawar ) यांच्याविरोधात अनेकदा भ्रष्टाचार, सिंचन घोटाळा, जमीन व्यवहार यासारख्या मुद्द्यांवर जोरदार टीका केली होती आणि त्यांच्याविरोधात लढा दिला होता. तरीही या अपघाती मृत्यूला त्यांनी अत्यंत दुःखद आणि अप्रत्याशित मानले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेतून राजकीय विरोधी असूनही मानवी संवेदनांची झलक दिसून येते. डोकं खूप खूप सुन्न झाला ऐकून ! विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे… हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे…… खूप — Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 28, 2026 अपघाताची पार्श्वभूमी बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून चार्टर्ड विमानाने (Learjet 45) निघाले होते. विमानात अजित पवारांसह त्यांचा पीएसओ, अटेंडंट आणि दोन क्रू मेंबर्स (पायलट व फर्स्ट ऑफिसर) असे एकूण सहा जण होते. बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी विमान रनवेवरून बाजूला गेले आणि शेतात कोसळले. यानंतर विमानाला भीषण आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले. DGCAच्या माहितीनुसार, अपघातातील सर्व सहा जणांचा मृत्यू झाला. हा अपघात सकाळी सुमारे ८.४५ ते ८.५० च्या दरम्यान घडला. अजित पवार बारामतीत चार सभा घेणार होते, ज्यात सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा समाविष्ट होती. मात्र, विमान लँडिंगदरम्यान हा भीषण अपघात झाला. इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, शिवसेना नेते संजय राऊत यांसह अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी म्हटले की, “बारामतीतच दादांचा मृत्यू व्हावा हा विचित्र योगायोग आहे.” राज्य सरकारने अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.