Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामती येथील भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने संपूर्ण राज्य शोकाकुल झाले आहे. या धक्कादायक बातमीचा परिणाम इतका तीव्र होता की, त्यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुदाम कारभारी बोडके (वय ६३, रा. ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. या आकस्मिक निधनाने दिंडोरी तालुका आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुदाम बोडके हे एका नातेवाईकाच्या दशक्रियाविधी (श्राद्ध) कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्याच वेळी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातातील मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर पडली. या धक्कादायक बातमीने ते अत्यंत गहिवरले आणि भावुक झाले. उपस्थितांशी त्यांनी अजित पवारांबद्दल भरभरून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि दादांच्या कार्यकर्ता म्हणून असलेल्या निष्ठेबद्दल बोलले. Ajit Pawar या अस्वस्थ मनःस्थितीत ते दुचाकीवरून नाशिककडे निघाले. नाशिकच्या मार्केट यार्ड परिसरात पोहोचल्यावर त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्रास वाढल्याने ते स्वतः एका खाजगी दवाखान्यात गेले, पण तेथे प्रकृती अधिक खालावली आणि ते कोसळले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तीव्र हृदयविकाराचा झटका हा मृत्यूचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. सुदाम बोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक होते आणि पक्षाच्या स्थानिक स्तरावरील कार्यक्रमांत नेहमी आघाडीवर राहत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा सहभाग होता. ढकांबे गाव आणि दिंडोरी तालुक्यातील अनेक विकासकामांत त्यांनी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने ढकांबे परिसरासह दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. हे पण वाचा : Supriya Sule Video : एकीकडे अजित पवारांचं निधन तर दुसरीकडे सुप्रिया सुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर; नेमकं काय घडलं?