Ajit Pawar Funeral : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसागर बारामतीत उसळला होता. अजित पवार यांच्या पार्थिवाला त्यांची दोन्ही मुलं पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. वडिलांना मुखाग्नि देताना दोन्ही मुलं धायमोकलून रडले. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना उपस्थितांचे डोळे देखील पानावले. Ajit Pawar Funeral : फक्त बारामतीच नाही तर राज्यभरातून अजित पवार यांचे कार्यकर्ते बारामतीत आले आहेत. अजितदादा अमर रहो, अजितदादा परत या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी टाहो फोडला. अजितदादांना मुखाग्नि दिल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी जय आणि पार्थ यांनी हात जोडून जड अंत:करणाने सर्वांचे आभार मानले. दरम्यान , अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला देशभरातील मंत्री, नेते मंडळी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, आंध्रप्रदेशचे मंत्री चंद्रशेखर रेड्डी यांच्यासह राज्यभरातील दिग्गज नेतेमंडळी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप ज्ञेयासाठी उपस्थित होते. Ajit Pawar Funeral :