Ahilyanagar Crime News : अहिल्यानगरमधील पारनेर तालुक्याच्या ढवळीपूरमध्ये वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक संतापाजनक घटना घडली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (वय 38) याने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.Ahilyanagar Crime News पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने पिडीतेला कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती. यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा गेल्या पाच वर्षांपासून या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी रविवारी पहाटे 4 वाजता बेड्या ठोकल्या. Ahilyanagar Crime News तसेच त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. Hemant Rasane : गॅस एजन्सी सरकारी देखरेखीखाली चालवाव्या; आमदार हेमंत रासने यांची मागणी मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे चांगले संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. Ahilyanagar Crime News याचाच फायदा घेऊन आरोपीने 2021पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडिता राहिली शांत Ahilyanagar Crime News पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन’, अशी भीती तो घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ सहन केला. पीडितेला बेदम मारहाण करत दिले चटके Ahilyanagar Crime News मात्र 10 मार्च 2026 रोजी आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, तू लवकर का आली नाहीस, असे विचारत आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीने तिला बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. इतकेच काय तर, स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जाळून टाकेन, घरात एकही माणूस ठेवणार नाही, अशी धमकीही नराधमाने पीडितेला दिली. परंतु 14 मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. पीडितेने सर्व प्रकार सांगितल्यानंतर भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेनंतर अहिल्यानगरमधून संतापाची लाट उसळली आहे. हेही वाचा: Education News : सावित्रींच्या लेकींची गगनभरारी! व्यावसायिक शिक्षणात मुलींचा टक्का वाढला; ‘या’ एका निर्णयाने बदललं नशीब