urmilla kothare: सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींना नेहमीच ट्रोलिंग आणि चर्चा यांचा सामना करावा लागतो. मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारेही याला अपवाद नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक अंदाज, चर्चा, अफवा ऑनलाइन दिसतात. पण या सगळ्याविषयी उर्मिलाने अतिशय स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर उर्मिला पुन्हा कामावर काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात उर्मिलाला दुखापत झाली होती. आता ती पूर्णपणे सावरली आहे आणि पुन्हा कामात व्यस्त आहे. मात्र, ती आणि तिचे पती आदिनाथ कोठारे सोशल मीडियावर एकत्र फोटो फारसे शेअर करत नाहीत. त्यामुळे “या दोघांचं काहीतरी बिनसलंय” अशा चर्चा ऑनलाइन व्हायरल होतात. ट्रोलिंगबद्दल उर्मिलाची थेट प्रतिक्रिया “ट्रोलिंगचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. मी कमेंट्स वाचतच नाही. कमेंट्समध्ये लोक खूप विषारी लिहितात, त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची गरजच वाटत नाही. माझ्याकडे इतका कामाचा व्याप आहे की कोण काय बोलतंय हे बघायला वेळच नाही.” ती पुढे म्हणाली: “इंटरनेटवर फिरणाऱ्या काही गोष्टी खऱ्या असतात, तर काही खोट्या असतात. त्यामुळे प्रेक्षकांनीही जे ऐकता, वाचता त्यावर लगेच विश्वास ठेवू नये. कारण त्यातलं अर्धंच खरं असतं.” मुलगी जिजाला सोशल मीडिया पाहू देत नाही उर्मिला आणि आदिनाथ यांची मुलगी जिजा अजून लहान आहे. उर्मिलाने सांगितले, “आम्ही जिजाला सोशल मीडियापासून दूर ठेवलं आहे. तिला युट्यूबही पाहू देत नाही. घरात ओटीटीवरील निवडक शोच पाहिले जातात. त्यामुळे तिच्या समोर अनावश्यक कंटेंट जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो.” उर्मिलाचा अभिनय प्रवास उर्मिला कोठारे ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री असून तिने 14 वर्षांपूर्वी अभिनेता आदिनाथ कोठारेशी लग्न केले. तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिका केल्या आहेत. सध्या ती ‘फिल्टर कॉफी’ या नाटकात काम करतेय. तसेच ‘पुन्हा घाशीराम कोतवाल’ या नाटकातही ती छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारत आहे.