Reel Star Death : सोशल मीडिया जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध रील स्टार (Reel Star Death) आणि कंटेंट क्रिएटर अरुण तुपे याचे आज मंगळवारी सकाळी अचानक निधन झाले. बालाजी नगर परिसरातील त्याच्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.Reel Star Death मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरुण तुपे हा (Reel Star Death) छत्रपती संभाजीनगरच्या बालाजी नगर भागात राहत होता. आज सकाळी कुटुंबीयांनी त्यांना घरात अत्यवस्थ अवस्थेत आढळून आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. काही वृत्तांनुसार, त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह घाटी शासकीय रुग्णालयात पाठवला असून, वैद्यकीय अहवालानंतरच याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. अरुण तुपे हा इंस्टाग्रामवर “कोण अरुण तुपे?” या नावाने अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या अकाउंटवर सुमारे १.७९ लाख फॉलोअर्स होते. त्याच्या वेगळ्या विनोदी आणि हटके स्टाइलच्या रील्सना लाखो व्ह्यूज मिळत असत. मराठी भाषेतून सामाजिक विषयांवर आधारित त्याच्या मजेदार व्हिडिओमुळे तरुणांमध्ये त्यांची मोठी चाहत होती. त्याच्या रील्समुळे हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे अरुण हे सोशल मीडिया क्रिएटर्समध्ये एक खास नाव होते. धक्कादायक बाब म्हणजे, निधनाच्या काही तासापूर्वीच त्याने इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली होती आणि चाहत्याच्या कमेंट्सना उत्तर देत होता. यानंतर अचानक त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.