Mahi Vij | टीव्ही अभिनेत्री माही विज आणि अभिनेता जय भानुशाली यांनी काही दिवसांपूर्वी घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनी एकत्रित स्टोरी शेअर करत चाहत्यांना वेगळे होत असल्याचे सांगितले होते. घटस्फोटाच्या घोषणेनंतर माहीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचा जवळचा मित्र नदीम कुरेशीसोबत एक फोटो शेअर केला होता. नदीम कुरेशी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत माहीने कॅप्शनमध्ये त्याला आय लव्ह यू देखील म्हटलं होतं. ते पाहून लोकांनी त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबत प्रश्न उपस्थित होऊ केले. यावर आता माहीने संताप व्यक्त करत टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. माहीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत म्हंटले की, “अनेकांनी मला याबद्दल बोलू नका असा सल्ला दिला. परंतु आम्ही दोघांनी एकमेकांचा आदर करत ज्या प्रकारे घटस्फोट घेतला आहे, ते काही लोकं पचवू शकत नाहीत, असं दिसत आहे. तुम्हाला कॉन्ट्रोव्हर्सी पाहिजे, वाद पाहिजे, घाण पाहिजे. नदीम माझा सर्वात चांगला मित्र आहे आणि तारा त्याला सहा वर्षांपासून अब्बा म्हणते. हा माझा आणि जयचा निर्णय होता की ती त्याला अब्बा म्हणेल. पण तुम्ही अब्बा या शब्दाचा अपमान केला. एखादी व्यक्ती एखाद्या फेजमधून जात असते, काही अनुभव येत असतो. पण तुम्ही लोक कर्माला घाबरत नाही. मी तुम्हा सर्वांना माझ्या गोष्टी खराब करू देणार नाही” असं तिने ट्रोलर्सना ऐकवलं. Mahi Vij | मिळालेल्या माहितीनुसार, नदीम हा सलमान खान टेलिव्हिजन (SKTV) चा सीईओ आणि मीडिया प्रोफेशनल आहे. तो जय-माहींचा जुना आणि जवळचा मित्र आहे. जय-माही एकत्र असतानाही नदीमचा त्यांच्या घरात नियमित वावर होता. गेल्या वर्षीही ‘फादर्स डे’ निमित्त ताराने नदीमसाठी इमोशनल पोस्ट शेअर केली होती. माहीच्या कठीण काळात नदीम तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, पण त्याला ‘अब्बा’ म्हणणे अनेकांना खटकले. Mahi Vij | हेही वाचा: “भारतासारखा दुसरा कोणीच नाही, मोदी-ट्रम्प यांची मैत्री खरी” ; सर्जियो गोर यांच्याकडून स्तुती, व्यापार कराराबद्दल दिले प्रमुख अपडेट