Kiara Advani | बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यानंतर आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केली. काही प्रोजेक्ट्समध्ये ही अट मान्य न झाल्याने तिने चित्रपटांमधून माघारही घेतली. तिच्या या विधानाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. यावर अनेक सेलिब्रिटींनी आपले मत व्यक्त केले होते. यानंतर आता आठ तासांच्या कामाच्या वेळेवर अभिनेत्री कियारा आडवाणीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. कियारा आणि तिचा पती, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी १५ जुलैला गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर कियाराने पहिल्यांदाच एका मुलाखतीत सांगितले की, “अतिरिक्त कामाचा ताण कोणत्याही क्षेत्रासाठी उपयोगाचा नसतो. मी कामाच्या ठिकाणी व घरी, काम करणाऱ्या प्रत्येकासाठी सन्मान, समतोल व आदर या तीन गोष्टी महत्त्वाच्या मानते. त्यानंतर तिला मानसिक थकवा दूर करण्यासाठी काय मदत होते, असे विचारले असता तिने, माझी मुलगी सरायाहच्या हसण्याचा आवाजच माझ्यासाठी मानसिक थकवा दूर करण्यासाठी सर्वांत मोठा उपाय असल्याचे सांगितले. दरम्यान, लवकरच कियारा Toxic : A Fairy Tale for Grown-Ups या चित्रपटात नादिया भूमिका साकारणार आहे. ही भूमिका तिच्यासाठी शारीरिक, मानसिक व भावनिकदृष्ट्या खूप आव्हानात्मक असल्याचे तिने सांगितले. Kiara Advani | दरम्यान, दीपिका पादुकोणनं आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्यानंतर तिच्या हातून अनेक प्रोजेक्ट्स गेले. अनेकांनी तिच्या वक्तव्याचा विरोध केला. कित्येकांनी तिला ट्रोलही केलं. पण, तरिसुद्धा दीपिका मात्र तिच्या मागणीवर ठाम होती. काहींनी दीपिकाला पाठींबा दिला. दीपिका प्रभाससोबत ‘स्पिरिट’मध्ये झळकणार होती. त्याचं दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं होतं. पण, त्यानंतर तिची या प्रोजेक्टमधून हाकालपट्टी झाली. त्यापाठोपाठ आठ तासांच्या शिफ्टच्याच मागणीमुळे तिला ‘कलकी 2898 एडी पार्ट 2’सारख्या प्रमुख चित्रपटांनाही मुकावं लागलं. हेही वाचा: ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणेचा साखरपुडा सोहळा संपन्न; फोटो व्हायरल