Story Of Oscar Trophy: जगातील चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे ऑस्कर( Oscar) पुरस्कार. प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की आपल्या कामासाठी ही सुवर्ण ट्रॉफी मिळावी. पण या ट्रॉफीची कल्पना कशी आली, तिचे डिझाइन कसे तयार झाले आणि ट्रॉफीवर दिसणारा नग्न पुरुष कोण आहे, याबद्दल अनेक रंजक गोष्टी आहेत. ऑस्कर पुरस्काराची सुरुवात १९२७ साली झाली. एमजीएम स्टुडिओचे मालक लुईस बी. मेयर यांच्या मनात चित्रपटसृष्टीसाठी एक संघटना तयार करण्याची कल्पना आली. या संघटनेमुळे चित्रपट उद्योगातील लोकांना एकत्र आणता येईल आणि त्यांचे हित जपले जाईल, असा त्यांचा विचार होता. यासाठी त्यांनी काही सहकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. त्यामध्ये दिग्दर्शक फ्रेड निब्लो, निर्माते फ्रेड बेटसन आणि अभिनेते कॉनरॅड नागेल सहभागी झाले होते. या सर्वांना ही कल्पना आवडली. त्यानंतर हॉलीवूडमधील ३६ नामांकित व्यक्तींना एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले आणि ‘अकॅडमी पुरस्कार’ ही संकल्पना मांडण्यात आली. सर्वांनी ती मान्य केली आणि याच बैठकीत या पुरस्काराची पायाभरणी झाली.Story Of Oscar Trophy यानंतर पुरस्कार विजेत्यांना काय द्यायचे यावर चर्चा झाली. तेव्हा एक वेगळी आणि आकर्षक ट्रॉफी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमजीएम स्टुडिओचे आर्ट डायरेक्टर सेड्रिक गिबन्स यांना ट्रॉफीचे डिझाइन करण्याची जबाबदारी देण्यात आली.Story Of Oscar Trophy गिबन्स यांनी एक शूरवीर (नाइट) तलवार हातात घेऊन फिल्म रीलवर उभा असलेला स्केच तयार केला. रीलला पाच स्पोक आहेत. अकॅडमीच्या पाच प्रमुख शाखांचे प्रतीक मानल्या जातात. त्या म्हणजे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि लेखक. शूरवीराच्या हातातील तलवार चित्रपटसृष्टीच्या प्रगतीचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते.Story Of Oscar Trophy या स्केचला प्रत्यक्ष मूर्तीचे रूप देण्याचे काम लॉस एंजेलिसमधील शिल्पकार जॉर्ज स्टॅन्ली यांनी केले. त्यांनी या डिझाइनला अधिक आकर्षक आणि आधुनिक स्वरूप दिले. आजही ऑस्कर ट्रॉफी जवळपास त्याच डिझाइनमध्ये दिली जाते. Story Of Oscar Trophy ट्रॉफीवर दिसणाऱ्या नग्न पुरुषाबद्दलही एक रंजक कथा सांगितली जाते. काही अहवालांनुसार मेक्सिकोचे अभिनेते आणि चित्रपट निर्माते एमिलियो ‘एल इंडियो’ फर्नांडिस यांनी या ट्रॉफीसाठी नग्न मॉडेल म्हणून पोज दिला होता. मात्र अकॅडमीने याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. Story Of Oscar Trophy या ट्रॉफीचे अधिकृत नाव ‘अकॅडमी अवॉर्ड ऑफ मेरिट’ असे आहे. मात्र ‘ऑस्कर’ हे नाव कसे पडले याचीही एक मजेशीर कथा आहे. अकॅडमीच्या लायब्रेरियन मार्गारेट हेरिक यांनी ही ट्रॉफी पाहिल्यानंतर ती त्यांच्या अंकल ऑस्करसारखी दिसते असे म्हटले. त्यानंतर या ट्रॉफीला ‘ऑस्कर’ नाव मिळाले आणि तेच नाव जगभर प्रसिद्ध झाले. ऑस्कर ट्रॉफी सुमारे १३ इंच उंच असते आणि तिचे वजन जवळपास ३.८५ किलो असते. सुरुवातीला ती टिन आणि तांब्यापासून तयार केली जात असे आणि त्यावर सोन्याचा मुलामा दिला जात होता. आज ही ट्रॉफी प्रामुख्याने तांब्याची बनवून त्यावर २४ कॅरेट सोन्याची परत चढवली जाते. पहिला ऑस्कर पुरस्कार सोहळा १६ मे १९२९ रोजी झाला. हा कार्यक्रम हॉलीवूडमधील रूझवेल्ट हॉटेलच्या ब्लॉसम रूममध्ये झाला होता. त्या कार्यक्रमाला सुमारे २७० लोक उपस्थित होते आणि हा सोहळा केवळ १५ मिनिटांत संपला. विशेष म्हणजे, पहिल्या ऑस्करसाठी एका कुत्र्याचेही नाव चर्चेत आले होते. टिन टिन नावाच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यामुळे त्याला पुरस्कार देण्याचा विचार झाला होता. मात्र शेवटी हा पुरस्कार जर्मन अभिनेते एमिल जेनिंग्स यांना देण्यात आला. आज ऑस्कर पुरस्कार हा चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा सन्मान मानला जातो आणि जगभरातील कलाकारांसाठी तो यशाचे सर्वोच्च प्रतीक ठरला आहे.