Hai Jawani Toh Ishq Hona Hai Teaser : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन( Varun Dhawan ) याचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘है जवानी तो इश्क होना है’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले होते. आता सिनेमाचा पहिला रंजक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाचा पहिला समोर आल्यानंतर चर्चेचा विषय ठरत आहे. Hai Jawani Toh Ishq Hona Hai Teaser दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या खास कॉमेडी शैलीत बनवलेला हा सिनेमा प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. फर्स्ट लूकमध्ये एका भव्य महालातून कथा सुरू होते, जिथे दोन मुलं आपल्या आई-वडिलांविषयी चर्चा करताना दिसतात. दोघांच्या वडिलांचे नाव एकच असल्याचे उघड होताच कथेला ट्विस्ट मिळतो. Hai Jawani Toh Ishq Hona Hai Teaser यानंतर वरुण धवन ‘जस’ या भूमिकेत एन्ट्री घेतो. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर ‘बानी’ आणि पूजा हेगडे ‘प्रीती’च्या भूमिकेत दिसतात. या दोघींमध्ये अडकलेल्या वरुणच्या आयुष्यात निर्माण होणारा गोंधळ आणि त्यातून उलगडणारी विनोदी कथा हा सिनेमाचा मुख्य गाभा असल्याचे टीझरवरुन दिसते. प्रेक्षकांना वरुण धवन अशा हलक्याफुलक्या कॉमिक भूमिकांमध्ये विशेष आवडतो आणि अनेकजण त्याला नव्या युगाचा गोविंदा म्हणतात. त्यामुळे या सिनेमांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. खरंतर हा सिनेमा 12 जून 2026 रोजी रिलीज होणारा हा सिनेमा आता हा सिनेमा 22 मे 2026 रोजी सिनेमा प्रदर्शित होणार असून, टीझरमुळे सिनेमाची उत्सुकता वाढवली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता ट्रेलरकडे लागले आहे. या सिनेमात वरुण धवण, पूजा हेगडे आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहे. तर मौनी रॉय आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हेही वाचा : Assi Movie OTT Release: थिएटरनंतर आता ओटीटीवर ‘अस्सी’; तापसी पन्नूची दमदार फिल्म घरबसल्या पाहण्याची संधी