Tara Sutaria Breakup : बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहाडिया यांच्या नात्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनीही आपापल्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांचं नातं आता संपुष्टात आलं आहे. साधारण एक वर्षापेक्षा कमी काळ टिकलेलं हे नातं आपसी संमतीने संपल्याचं सांगितलं जात आहे. ‘फिल्मफेअर’च्या रिपोर्टनुसार, तारा आणि वीर यांनी शांतपणे ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. याआधी दोघंही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. जुलै २०२५ मध्ये सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत दुजोरा दिला होता. एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टनंतर वादाला सुरुवात तारा आणि वीर यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा एपी ढिल्लोंच्या मुंबईतील कॉन्सर्टनंतर सुरू झाल्या. या कॉन्सर्टदरम्यान तारा आणि एपी ढिल्लों स्टेजवर एकमेकांच्या खूप जवळ दिसले. दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे आणि किस केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामुळे तारा टीकेच्या भोवऱ्यात सापडली. वीर नाराज असल्याच्या अफवा या घटनेनंतर वीर पहाडिया नाराज असल्याच्या अफवांनी जोर धरला. सोशल मीडियावर त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यामध्ये ते अपसेट असल्याचं भासत होतं. त्यामुळे तारा-एपी ढिल्लोंच्या जवळीकांमुळेच ब्रेकअप झाला, असे कयास बांधले जाऊ लागले. ताराचं स्पष्टीकरण आणि फेक व्हिडीओचा आरोप नंतर तारा सुतारियाने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत, आपली बदनामी करण्यासाठी काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे देऊन फेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप केला. तिच्या म्हणण्यानुसार, हे व्हिडीओ मुद्दाम चुकीच्या पद्धतीने एडिट करण्यात आले होते. सेलिब्रिटी मित्र ओरीनेही याबाबत खुलासा करत वीरचा एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये वीर गाण्यावर मजेत नाचताना दिसत होता. ओरीच्या मते, वीर अपसेट नव्हता, मात्र त्याच्या चेहऱ्यावरील भाव एडिट करून वेगळाच अर्थ काढण्यात आला. एक वर्षाचं नातं आणि जुना ब्रेकअप तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचं नातं २०२५ मध्ये सुरू झालं होतं. एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या आणि नंतर त्यांनी ते अधिकृत केलं. वीरच्या आधी तारा अभिनेता आदर जैनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र ब्रेकअपनंतर आदरने आलेखा आडवाणीशी लग्न केलं, जी ताराची मैत्रीण असल्याचंही सांगितलं जातं. एकूणच, एपी ढिल्लोंच्या कॉन्सर्टनंतर उफाळलेल्या वादानंतर तारा आणि वीर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा आणखी गडद झाल्या असून, या नात्याच्या समाप्तीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.