Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘जूळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरांमध्ये पोहोचली आहे. तिचा ‘फुलवंती’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. निर्माती म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट होतो. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहे. उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगणासोबतच ती एक निर्मिती, उद्योजिका म्हणून नावारुपाला आली आहे. ‘फुलवंती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ता माळीनं नुकतीच सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. प्राजक्ता माळीचा एसाच एक AI जनरेटेड फोटो तिच्याच फॅन पेजनं बनवलेला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो पाहताच प्राजक्ता माळी संतापली आणि तिनं तिच्या ऑफिशिअल अकाउंटवर एक स्टोरी टाकून संताप व्यक्त केलाय. तसेच, प्राजक्तानं चाहत्यांना आणि फॅन पेजेसना एक कळकळीची विनंतीही केली आहे. प्राजक्ता माळीनं आपल्या सोशल मीडिया पोस्टवर लिहिलंय की, “हा फोटो दिसायला कितीही सुंदर असला तरी मी या फोटोचं अजिबातच कौतुक करणार नाही. मी AI नं तयार केलेल्या फोटो आणि व्हिडीओंना अजिबात प्रोत्साहन देणार नाही. मी माझ्या फॅन पेजेसना तसेच इतरांनाही विनंती करते की, हे असं बनवणं थांबवा.” सोबतच प्राजक्तानं तिचा AI द्वारे तयार केलेला फोटो शेअर केला आहे. Prajakta Mali | अनेकदा AI जनरेटेड फोटोंमुळे डोक्याला ताप होतो. अनेकदा असे फोटो दिशाभूल करतात. यावर अनेक कलाकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता प्राजक्ता माळीने देखील याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. Prajakta Mali | हेही वाचा: Pune District : पिंपळगाव जिल्हा परिषद गटात मोहितेंची प्रतिष्ठा पणाला