Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. याद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कातही राहते. नुकतेच तिला लग्नाबाबत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे. सध्या श्रद्धा राहुल मोदीला डेट करत असून अनेकदा दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियाद्वारे समोर आले आहेत. अलीकडेच श्रद्धाने तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओ एकाने कमेंट करत विचारलं, “तू लग्न कधी करणार आहे?” त्यावर श्रद्धाने दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलंय. “मी करणार, लग्न करणार”, असं उत्तर श्रद्धाने दिलं आहे. त्यामुळे ती लवकरच बॉयफ्रेंड राहुल मोदीशी लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. Shraddha Kapoor | श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या डेटिंगच्या चर्चा 2024 मध्ये सुरु झाल्या, त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यालाही दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. 2024 मध्ये श्रद्धाने राहुलसोबत फोटोसुद्धा शेअर केला होता. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झाल्याचंही म्हटलं गेलं. परंतु 2025 मध्ये पुन्हा त्यांना एकत्र पाहिलं गेलं. मात्र अद्यापही श्रद्धा किंवा राहुलने त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. कोण आहे राहुल मोदी? राहुल मोदीची ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रद्धा कपूरसोबत भेट झाली. तो एक पटकथालेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. राहुलने याआधी ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टिटू की स्वीटी’ यांसारख्या चित्रपटांसाठी काम केलं आहे. दरम्यान, श्रद्धा कपूर लवकरच ‘इठा’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. Shraddha Kapoor | हेही वाचा : काँग्रेस आणि एमआयएमसोबत झालेल्या युतीवर फडणविसांची प्रतिक्रिया; थेट कारवाईचा दिला इशारा