Sara Arjun: बॉलिवूडमध्ये पदार्पण करताच अवघ्या २० वर्षांच्या सारा अर्जुनने आपल्या अदांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तिची झलक पाहून तिला ‘छोटी ऐश्वर्या’ म्हणून ओळख मिळाली होती. आता मोठ्या पडद्यावर मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसल्यानंतर ती सोशल मीडियावरही जोरदार चर्चेत आहे. सारा अर्जुनने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणाऱ्या ‘धुरंधर’ चित्रपटातून हिरोईन म्हणून डेब्यू केला आहे. याआधी तिने बालकलाकार म्हणून अनेक जाहिराती आणि चित्रपटांमध्ये काम केलं होतं. ‘पोन्नियिन सेल्वन २’मध्ये ऐश्वर्या रायच्या बालपणीची भूमिका साकारल्यानंतर तिला ‘छोटी ऐश्वर्या’ हा टॅग मिळाला. आता हिरोईन बनताच ती बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्रींसाठीही स्पर्धा ठरताना दिसतेय. काळ्या गाऊनमधील लूक ठरला खास चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंट्समध्ये सारा विविध स्टायलिश लूकमध्ये दिसली, पण काळ्या गाऊनमधील तिचा लूक सर्वाधिक चर्चेत आहे. सेलिब्रिटी स्टायलिस्ट स्मृती चौहान यांनी तिला प्रसिद्ध डिझायनर अमित अग्रवाल यांच्या खास डिझाइनर गाऊनमध्ये स्टाइल केलं होतं. हा गाऊन आधुनिक आर्टवर्कसारखा दिसत असून मेटॅलिक फॅब्रिक, वेगळे आकार आणि अनोखा सिल्हूट यामुळे तो खास ठरतो. खांद्याजवळ आर्मरप्रमाणे उभा डिझाइन दिल्यामुळे गाऊनला मॉडर्न आणि हटके लूक मिळाला आहे. डीप नेकलाइनमुळे ग्लॅमर वाढला असून स्कर्टच्या भागात दिलेल्या फ्लोरल डिटेलिंगमुळे लूक अधिक उठून दिसतो. मिनिमल ज्वेलरी, परफेक्ट मेकअप साराने ज्वेलरी फार साधी ठेवली आहे. डायमंड इयररिंग्स, छोटी स्टड्स आणि हातात रिंग एवढ्याच अॅक्सेसरीज तिने वापरल्या. त्यामुळे ड्रेसचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. केस स्लीक बनमध्ये बांधले असून मेकअपही सटल ठेवला आहे. न्यूड लिप्स, सौम्य आयशॅडो आणि ब्लश्ड चीक्समुळे तिचा संपूर्ण लूक एलिगंट वाटतो. एकूणच, काळ्या गाऊनमधील सारा अर्जुनचा हा अवतार चाहत्यांना प्रचंड आवडला असून सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा सुरू आहे.