Sanjay Leela Bhansali: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये यंदा एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळणार आहे. गेल्या ७७ वर्षांत कधीही न घडलेली घटना २०२६ मध्ये प्रत्यक्षात येणार असून, पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सिनेमाचं सादरीकरण होणार आहे. या विशेष आणि मानाच्या जबाबदारीसाठी दिग्गज निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सिनेमावर आधारित झलक सादर केली जाणार आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने हे विशेष सादरीकरण घडवून आणलं जाणार असून, त्यातून भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरव केला जाणार आहे. आतापर्यंत परेडमध्ये कला, संस्कृती, संरक्षण, राज्यांची परंपरा यांचं दर्शन घडत आलं असलं, तरी सिनेमाला कधीच स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक ठरणार आहे.Sanjay Leela Bhansali राष्ट्रीय मंचावर भन्साळींची मोठी जबाबदारी हा सन्मान केवळ संजय लीला भन्साळी यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय मनोरंजनसृष्टीसाठी अभिमानाचा क्षण मानला जात आहे. राष्ट्रीय मंचावर इतक्या मोठ्या स्तरावर भारतीय सिनेमाचं प्रतिनिधित्व पहिल्यांदाच होणार आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप भन्साळी किंवा माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.Sanjay Leela Bhansali सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते संजय लीला भन्साळी हे दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक, संपादक आणि संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कलात्मक आणि भव्य दिग्दर्शनासाठी त्यांना आतापर्यंत ७ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. देवदास, ब्लॅक, बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या चित्रपटांनी भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. भव्य सेट्स, ऐतिहासिक कथा आणि सौंदर्यपूर्ण मांडणी ही भन्साळींच्या सिनेमाची खास ओळख आहे. आगामी चित्रपट भन्साळी सध्या दिग्दर्शनासोबतच निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘दो दिवाने शहर में’ या चित्रपटाचे ते सहनिर्माते असून, हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच रणबीर कपूर, विकी कौशल आणि आलिया भट्ट यांच्यासोबतचा बिग बजेट चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ ते दिग्दर्शित करत असून, हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२६ रोजी रिलीज होण्याची शक्यता आहे.Sanjay Leela Bhansali प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय सिनेमाची झलक साकारण्याचा हा क्षण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ऐतिहासिक ठरणार असून, संजय लीला भन्साळी यांच्या कारकिर्दीतील आणखी एक सुवर्णअध्याय म्हणून याची नोंद होणार आहे.