Rhea Chakraborty: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर आयुष्यातील सर्वात कठीण काळातून गेलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता पूर्णपणे बदलली आहे. तिने चित्रपटांना रामराम ठोकून स्वतःसाठी एक नवा मार्ग शोधला आहे. आज ती सुमारे 40 कोटी रुपये मूल्यांकन असलेल्या कपड्यांच्या कंपनीची मालकीण बनली आहे. अभिनय सोडून नवा व्यवसाय 2020 नंतर सतत लोकांच्या टीकेचा सामना करताना रियाच करिअर जवळपास संपल्यासारख झाल होत. अभिनयासाठी फोन येणे बंद झाले. त्या काळात रिया आणि तिचा भाऊ शोविक दोघांचेही आयुष्य विस्कळीत झाले होते. याच काळात तिनं आपला पॉडकास्ट ‘चॅप्टर 2’ सुरू केला. तिथे विविध पाहुण्यांच्या संघर्षकथांनी तिला प्रेरणा दिली आणि तिथूनच तिला कपड्यांचा ब्रँड सुरू करण्याची कल्पना सुचली. अशा लोकांकडून प्रेरणा घेणं हा तिच्यासाठी पुन्हा उभं राहण्याची “दुसरी संधी” होती. ‘चॅप्टर 2 ड्रिप’ 40 कोटींचा ब्रँड रियाने ऑगस्ट 2024 मध्ये ऑनलाइन ब्रँड ‘Chapter 2 Drip’ सुरू केला.2025 च्या जूनमध्ये तिने मुंबईच्या बँद्रा येथे पहिले ऑफलाइन स्टोअर सुरू केले. किराया आणि खर्च वाढतील म्हणून तिला भीती वाटत होती, पण शोविकने तिला धीर दिला. आधीच ऑनलाइन विक्री चांगली होत असल्याने तिला गुंतवणूकदारांचाही विश्वास मिळाला. किशोर आणि अशनी बियानी यांच्या रिटेल फंडकडून तिला 1 कोटी रुपयांची सीड फंडिंग मिळाली आणि पाहता पाहता ब्रँडचे मूल्यांकन 40 कोटींपर्यंत पोहोचले. पॉडकास्टवर आलेल्या गेस्टमुळे बदलली दिशा रियाने सांगितले की, एका पॉडकास्ट गेस्टकडून तिला मोठी प्रेरणा मिळाली. त्यांनी चर्चा करताना अचानक म्हटले, “तुम्ही आम्हाला फ्री इक्विटी देऊ शकता.” रियाने लगेच उत्तर दिलं, “मी फ्री इक्विटी देणार नाही, पण योग्य मूल्य देऊन आम्ही नक्कीच इक्विटी देऊ.” त्या गेस्टने सांगितले की ब्रँडमध्ये दम असेल, रेव्हेन्यू येत असेल, नफा होत असेल…तर गुंतवणूकदार नक्की येतात. रिया म्हणाली की, तिने कधीही उगाच 5X किंवा 10X मूल्यांकन मागितले नाही. कारण तिच्याकडे आधीच आकडे उत्तम होते आणि कंपनी नफा कमावत होती. शोविकचे करिअरही उद्ध्वस्त झाले होते रियाने सांगितले शोविकने CAT मध्ये 96% मार्क मिळवले होते. एका नामांकित कॉलेजमध्ये MBA करायला जाणार होता. पण त्याचवेळी तो जेलमध्ये गेला आणि बाहेर यायला उशीर झाला. पहिले सेमिस्टर संपले होते आणि त्याची MBA ची संधीही गेली. त्यामुळे दोघांनी एकत्र येऊन नवं काहीतरी उभं करणं हेच ठरवलं. चित्रपटसृष्टीतून बाहेर फेकलं गेल्यानंतरही रिया चक्रवर्तीने हार मानली नाही. आयुष्यातल्या सर्वात वाईट टप्प्यातून जात ती आज स्वतःची 40 कोटींची कंपनी उभी करण्याइतकी सक्षम बनली आहे.