Priyanka Deepika fans: बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या दोघीही लोकप्रिय अभिनेत्री आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर या दोघींच्या नावामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे. यामागचं कारण ठरलं आहे प्रियंका चोप्राने केलेले इंस्टाग्रामवरील एक लाईक. नेमकं काय घडलं? सोशल मीडियावर एका कंटेंट क्रिएटरची रील सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रीलमध्ये प्रियंका चोप्राच्या कामाविषयी कौतुक करत तिच्या मेहनतीला “खरी डेडिकेशन” असं म्हटलं आहे. रीलमध्ये असं सांगण्यात आलं की, प्रियंका फक्त १२ तासांसाठी मुंबईत आली, शूटिंग पूर्ण केलं आणि पुन्हा अमेरिकेला रवाना झाली. मात्र याच रीलमध्ये दीपिका पादुकोणच्या ,(Deepika Padukone) ८ तासांच्या शिफ्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, ज्यामुळे अनेकांनी हे दीपिकाविरोधात असल्याचं म्हटलं. Priyanka chopra प्रियंकाच्या लाईकमुळे भडका या रीलला स्वतः प्रियंका चोप्राने लाईक केल्याचं समोर येताच वादाला तोंड फुटलं. दीपिका पादुकोणच्या चाहत्यांना हे अजिबात आवडलं नाही. त्यांनी सोशल मीडियावर प्रियंकावर टीका करत नाराजी व्यक्त केली. दीपिकाच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की, ८ तासांची शिफ्ट ही नखरा नसून वर्क-लाईफ बॅलन्स आणि मानसिक आरोग्याशी संबंधित बाब आहे. एका युजरने लिहिलं, “दीपिकाला स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ हवा, यात चुकीचं काय?” काही जणांनी रीलमधील भाषाही अपमानास्पद असल्याचं म्हटलं. प्रियंकाच्या चाहत्यांची बाजू दुसरीकडे प्रियंका चोप्राच्या चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे. त्यांच्या मते, एखादी पोस्ट लाईक करणं म्हणजे त्या पोस्टमधील प्रत्येक मुद्द्याशी सहमत असणं आवश्यक नाही. प्रियंकाला विनाकारण या वादात ओढलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. deepika padukone दोघींकडून अद्याप प्रतिक्रिया नाही या संपूर्ण प्रकरणावर प्रियंका चोप्रा किंवा दीपिका पादुकोण (deepika padukone) यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या घटनेमुळे एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली आहे की, सोशल मीडियावरचा एखादा छोटासा ‘लाईक’ देखील मोठा वाद निर्माण करू शकतो. तसंच, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये कामाचे तास, वैयक्तिक निवड आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या यावर टीका करणं कितपत योग्य आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे.