Mrunal Dhanush: अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांच्या लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहेत. व्हॅलेंटाईन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला दोघं लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. ही बातमी व्हायरल होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र आता मृणाल ठाकूरने या अफवांवर स्पष्ट प्रतिक्रिया देत या सर्व बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं आहे. चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत मृणालने लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. मृणालच्या जवळच्या सूत्रानुसार, “मृणाल पुढच्या महिन्यात लग्न करत नाही. तिच्या लग्नाबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार आहेत.” सूत्रांनी असंही सांगितलं की, ज्या तारखेला मृणालच्या लग्नाच्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याच काळात तिचा ‘दो दीवाने’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसणार आहे. तसेच मार्च महिन्यात तिचा एक तेलुगू चित्रपटही रिलीज होणार असल्यामुळे सध्या लग्नाचा प्रश्नच नाही, हे स्पष्ट होतं. मृणाल आणि धनुष यांच्यातील डेटिंगच्या चर्चा ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाल्या होत्या. ‘सन ऑफ सरदार २’च्या प्रीमियरदरम्यान मृणाल धनुषकडे जाताना दिसली होती. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांच्या नात्याबाबत चर्चा रंगल्या. तथापि, मृणाल आणि धनुष दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कधीच अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांची मैत्री आणि चांगली केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते, पण लग्न किंवा नात्याबाबत सध्या काहीही ठरलेलं नाही. म्हणूनच, चाहत्यांनी लग्नाच्या अफवांपेक्षा आता मृणाल आणि धनुष यांच्या आगामी चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावं, असं चित्र स्पष्ट होत आहे.