Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोरा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर ती अर्जुन कपूरला सहा वर्षे डेट करत होती. मात्र अर्जुन आणि मलायकाचे ब्रेकअप झाल्यानंतर तिचे नाव एका मिस्ट्री मॅनसोबत जोडले जाऊ लागले. गायक ए. पी. ढिल्लोंच्या कॉन्सर्टमधील दोघांच्या व्हिडिओमुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र यावर भाष्य करत तिने चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एका मुलाखतीत मलायका म्हणाली, “लोकांना गॉसिप करायला आवडतं. तुम्ही एखाद्यासोबत बाहेर दिसलात की तो चर्चेचा मोठा विषय बनतो. मला अनावश्यक अफवांना खतपाणी घालायचं नाही. त्याचा काहीही अर्थ नाही. मी कधी एखाद्या मित्रासोबत दिसले तरी लगेच माझं नाव त्या व्यक्तीशी जोडलं जातं. आता तर आम्ही अशा चर्चांवर हसतो. माझी आई मला फोन करून विचारते, ‘आता हा कोण आहे बाळा? लोक कोणाबद्दल बोलत आहेत?’ हे सर्व आता मस्करीसारखं वाटतं,” असे म्हणत तिने मिस्ट्री मॅनसोबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले. ए. पी. ढिल्लोंच्या कॉन्सर्टनंतर 29 ऑक्टोबर रोजी मुंबईतील एनरिक इग्लेसियासच्या कॉन्सर्टमध्ये या दोघांना पहिल्यांचा एकत्र पाहिलं गेलं होतं. दरम्यान, या तरुणाचे नाव हर्ष मेहता सांगितले जात आहे. हर्ष आणि मलायका यांच्या वयात तब्बल 17 वर्षांचं अंतर आहे. तर मलायका 50 वर्षांची आहे. 33 वर्षांचा हर्ष हा हिरे व्यापारी असल्याचं समोर आले आहे. Malaika Arora | मलायकाने अभिनेता अरबाज खानशी लग्न केलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये तिने घटस्फोट घेतला. त्यानंतर 2018 मध्ये अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत होती, मात्र गेल्या वर्षी या दोघांचा ब्रेकअप झाला. Malaika Arora | हेही वाचा : Nupur Stebin: नववधू नूपुर सेननचा रॉयल अंदाज; रिसेप्शनमध्ये स्टेबिन बेनसोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय