Love In Vietnam Release In Korea: शांतनु माहेश्वरी आणि अवनीत कौर अभिनीत ‘लव्ह इन व्हिएतनाम’ ही फिल्म भारतात चार महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाली होती. भारतात या चित्रपटाला खास प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आता ही फिल्म भारतानंतर कोरियामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. 8 डिसेंबरला कोरियामध्ये रिलीज राहत शाह काझमी दिग्दर्शित लव्ह इन व्हिएतनाम 8 डिसेंबर 2025 रोजी कोरियामध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतात ही फिल्म 12 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. ही कथा सबाहतिन अली यांच्या सर्वाधिक विकली जाणारी कादंबरी ‘मॅडोना इन अ फर कोट’ वर आधारित असून, हृदयस्पर्शी प्रेमकहाणीवर आधारित आहे. हिंदी सिनेमात भारत–व्हिएतनाम यांचा हा पहिलाच संयुक्त प्रकल्प आहे. अवनीत कौरची प्रतिक्रिया फिल्म कोरियात रिलीज होत असल्याने अवनीत कौरने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “कोरियन प्रेक्षक आमच्या चित्रपटाला इतकं प्रेम देत आहेत, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आमचा चित्रपट तिथे रिलीज होणं म्हणजे एखादं गिफ्टच आहे. रिलीजच्या वेळी मी स्वतः कोरियात जाऊन प्रेक्षकांचे आभार मानू इच्छिते.” शांतनु माहेश्वरीचे वक्तव्य शांतनु माहेश्वरीनेही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “कोरियन थिएटर्समध्ये फिल्म प्रदर्शित होणार याचा प्रचंड आनंद आहे. ते प्रेक्षक आमच्या कथेमधल्या छोट्या–छोट्या भावनिक तपशीलांवरही लक्ष देतात, जे आम्हाला भारताबाहेर अपेक्षितच नव्हते. मला कोरियाची कलात्मक संस्कृती खूप आवडते. रिलीजदरम्यान तिथे जाऊन प्रेक्षकांना भेटण्याची माझी इच्छा आहे.”