Kriti Sanon Sister Nupur| मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारमंडळी सध्या लग्नबंधनात अडकत आहे. यानंतर आता अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या घरी देखील लगीनघाई सुरू झाली आहे. क्रितीची धाकटी बहीण आणि अभिनेत्री नुपूर सेनॉन लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नुपूर गायक स्टेबिन बेन याच्याशी विवाह करणार आहे. मागील काही दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. यानंतर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बॉलिवूड बबल’च्या वृत्तानुसार, नुपूर आणि स्टेबिन बेन यांचा शाही विवाह सोहळा ८ आणि ९ जानेवारी २०२६ मध्ये पार पडण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी रोजी मेहंदी आणि संगीत समारंभ होणार असून ९ जानेवारीला लग्न पार पडेल. हा विवाह सोहळा उदयपूरमधील आलिशान फेअरमोंट पॅलेसमध्ये होणार असल्याचे म्हंटले जात आहे.Kriti Sanon Sister Nupur| नुपूर ही रवी तेजासोबत तेलगू चित्रपटात झळकली होती. याशिवाय अक्षय कुमार सोबतच्या ‘फिलहाल’ या गाण्यात दिसली होती. तर स्टेबिन बेन हा ‘मेरा मेहबूब,’ ‘थोडा थोडा प्यार,’ आणि ‘बारिश’ या गाण्यांसाठी ओळखले जातो. त्याच्या गाण्यांना प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला. Kriti Sanon Sister Nupur| हेही वाचा: IMDb Top10 Stars Of 2025: शाहरुख–सलमानला मागे टाकत, ‘सय्यारा’ फेम अहान पांडे आणि अनीत पड्डा सर्वात लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीत