Kiran Rao Health : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव यांची तब्येत बिघडली आहे. किरण रावला चिकनगुनियाचं निदान झालं असून इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने याबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. सध्या किरण राव उपचार घेत असून या कठीण काळात मित्रमैत्रिणींची साथ मिळाल्याचे तिने सांगितले आहे. किरण रावने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती सोफ्यावर झोपून आराम करताना दिसत आहे. तर तिच्या बाजूला तिची मांजरदेखील बसल्याचं दिसत आहे. “मला आता चिकनगुनिया झाला आहे आणि ही माझी मिरी माझ्यावर काळजीपूर्वक नजर ठेवत आहे”, असं तिने म्हटलं आहे. दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने म्हटलं आहे की “हळूहळू बरी होत आहे. माझ्या मित्रमैत्रिणींनी पाठवलेले शुभेच्छांचे कार्ड आणि पुस्तक वाचत आहे. पण हे दुखणं लवकर बरं होणार नाही. तुम्हीही काळजी घ्या”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. Kiran Rao Social media post डिसेंबरमध्ये झाली होती अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यापूर्वी डिसेंबर 2025 मध्ये किरण राव यांची अपेंडिक्सची शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी तिने रुग्णालयातील फोटो शेअर करत प्रकृतीविषयी माहिती दिली होती. यावेळी तिने डॉक्टरांचे आणि चाहत्यांचेही आभार व्यक्त केले होते. यानंतर आता काही महिन्यांतच तिला चिकनगुनिया झाल्याने ती पुन्हा आजारी पडली आहे. दरम्यान, आमिर खानने 2002 मध्ये पहिली पत्नी रिना दत्त यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याने किरण रावसोबत डिसेंबर 2005 मध्ये विवाह केला. आमिरचा हा दुसरा विवाह होता. या दोघांना आझाद राव खान नावाचा मुलगा आहे, ज्याचा जन्म डिसेंबर 2011 मध्ये सरोगसीद्वारे झाला. मात्र 3 जुलै 2021 रोजी, लग्नाच्या 15 वर्षांनंतर दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. विभक्त झाल्यानंतरही ते चांगले मित्र असून अनेक कार्यक्रमात दोघे एकत्र दिसतात. Kiran Rao Health : हेही वाचा: Muslim Reservation : ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणायचं आणि दुसरीकडे आरक्षणासाठी…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच काँग्रेसची सरकारवर टीका