Dhurandhar 2: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याची ‘धुरंधर २’ ही फिल्म सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार धडाकेबाज कामगिरी करत आहे. पहिल्याच दिवशी १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केल्यानंतर या चित्रपटाने दुसऱ्या दिवशीही जबरदस्त कमाई करत २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘धुरंधर २’ने पहिल्या दिवशी तब्बल १०२.५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने ८०.७२ कोटी रुपये कमावले. त्यामुळे फक्त दोन दिवसांतच या चित्रपटाची एकूण कमाई २२६.२७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. रणवीर सिंहच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. फक्त भारतातच नाही, तर जगभरातही ‘धुरंधर २’ने दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाइड २४० कोटी रुपयांची कमाई केली असून, सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या चित्रपटाने प्रभास यांच्या ‘राजा साहेब’ या चित्रपटाचा वर्ल्डवाइड कलेक्शनही मागे टाकला आहे. आता ‘धुरंधर २’ची नजर ‘बॉर्डर २’च्या कमाईवर आहे. Dhurandhar 2 Dhurandhar 2 Day 2 Collection विशेष म्हणजे, अल्लू अर्जुन यांच्या ‘पुष्पा २’ या सुपरहिट चित्रपटाचा रेकॉर्डही ‘धुरंधर २’ने मोडला आहे. ‘पुष्पा २’च्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी ५६.९ कोटी रुपये कमावले होते, तर ‘धुरंधर २’ने त्यापेक्षा खूपच जास्त कमाई करत हा आकडा सहज पार केला. तसेच शाहरुख खान यांच्या ‘जवान’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईलाही ‘धुरंधर २’ने मागे टाकले आहे. Dhurandhar 2 दरम्यान, ‘धुरंधर २’सोबत रिलीज झालेल्या उस्ताद भगत सिंह या चित्रपटाची कामगिरी मात्र तुलनेने कमी राहिली आहे. पवन कल्याण यांच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३४.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली आणि फक्त ९.२५ कोटी रुपये मिळवता आले. त्यामुळे दोन दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई ४४ कोटी रुपयांवर थांबली आहे. Dhurandhar 2 एकंदरीत पाहता, ‘धुरंधर २’ने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद आणि जबरदस्त कमाईमुळे हा चित्रपट पुढील काही दिवसांत आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.