Dhurandhar 2: ‘धुरंधर: द रिवेंज’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांमध्ये त्याची मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटातील दमदार कथा आणि कलाकारांमुळे पहिल्या भागालाच प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, या चित्रपटाची कास्टिंग प्रक्रिया अजिबात सोपी नव्हती. रहमान डकैतपासून ते इतर महत्त्वाच्या भूमिकांसाठी मेकर्सना जवळपास दीड वर्ष मेहनत घ्यावी लागली. चित्रपटात रहमान डकैतची भूमिका अक्षय खन्ना यांनी साकारली आहे. त्यांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. पण ही भूमिका मिळवण्यासाठी सुमारे ५० ते ६० कलाकारांचे ऑडिशन घेण्यात आले होते. ओटीटी आणि दक्षिण भारतीय कलाकारांनाही संधी देण्यात आली होती. शेवटी ही भूमिका अक्षय खन्ना यांनाच देण्यात आली. विशेष म्हणजे, सुरुवातीला अक्षय खन्ना या भूमिकेसाठी तयार नव्हते. पण दिग्दर्शक आदित्य धर यांनी जवळपास चार तास स्क्रिप्ट समजावून सांगितल्यानंतर त्यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांनी “फँटास्टिक” असं म्हणत भूमिका स्वीकारली. Dhurandhar 2 चित्रपटात रणवीर सिंह सोबत सारा अर्जुन ही मुख्य अभिनेत्री आहे. या दोघांच्या वयात जवळपास २० वर्षांचं अंतर असल्यामुळे सुरुवातीला टीका झाली होती. पण कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी स्पष्ट केलं की, कथेनुसार तरुण मुलगी आवश्यक होती, त्यामुळे सारा अर्जुनची निवड केली गेली. Dhurandhar 2 Dhurandhar actor Akshaye Khanna सारा अर्जुनच्या निवडीसाठी तब्बल १३०० मुलींचे ऑडिशन घेण्यात आले होते. मेकर्सना एकदम नवीन चेहरा हवा होता. सारा याआधी बालकलाकार म्हणून काम करत होती, त्यामुळे तिची निवड प्रेक्षकांसाठी सरप्राइज ठरावी, असा विचार होता. Dhurandhar 2 चित्रपटातील आणखी एक महत्त्वाची भूमिका राकेश बेदी यांनी साकारली आहे. त्यांनी जमील जमाली या पाकिस्तानी नेत्याची भूमिका केली आहे. सुरुवातीला अनेकांनी त्यांना या भूमिकेसाठी योग्य नसल्याचं सांगितलं होतं. पण आदित्य धर यांनी त्यांना दिलेलं वचन पाळत ही भूमिका त्यांनाच दिली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. Dhurandhar 2 तसंच आर. माधवन यांनीही आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली. त्यांचा लूक तयार होण्यासाठी तासन्तास वेळ लागत होता. दिग्दर्शकांच्या सूचनेनुसार त्यांनी पूर्ण चित्रपटात ओठ आत घेत ठेवून वेगळा लूक तयार केला. ‘डोंगा’ या भूमिकेत नवीन कौशिक दिसले आहेत. विशेष म्हणजे, योग्य भूमिका न मिळाल्यामुळे ते इंडस्ट्री सोडण्याच्या विचारात होते. पण या चित्रपटामुळे त्यांना पुन्हा ओळख मिळाली. एकूणच, ‘धुरंधर’च्या प्रत्येक भूमिकेमागे मोठी मेहनत आणि विचार आहे. त्यामुळेच हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये इतका लोकप्रिय ठरला असून दुसऱ्या भागाकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.