Archana Puran Singh | अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने आपल्या अभिनयाने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती कपिल शर्मा याच्या शोमध्ये पाहायला मिळते. मात्र अर्चना एका दुर्मिळ आजार आजाराचा सामना करत आहे. याबाबत अर्चनाचा मुलगा आयुष्यमानने खुलासा केला आहे. अर्चना पूरण सिंग तिच्या यूट्यूबच्या माध्यमातून तिच्या रोजच्या जीवनातील माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. अर्चनाची दोन मुलं देखील त्यांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगत असतात. याच दरम्यान, आयुष्यमानने आईच्या गंभीर आजारावर मौन सोडलं. अर्चनाचा मुलगा आयुष्मान म्हणाला की, ‘मला माझ्या आईवर गर्व आहे. मागील वर्ष माझ्या आईसाठी फार कठीण वर्ष होतं. तिच्या हाताला फ्रॅक्चर झालं होतं आणि तिला एका दुर्मिळ आजाराने ग्रासलं. CRPS ज्यामुळे माझ्या आईचा हात आता कधीच पूर्वीसारखा होणार नाही. तरीही तिने काही सिनेमांमध्ये काम केलं. एवढंच नाही तर, एक वेब सीरिज देखील शूट केली. एक महिना तर पूर्ण 30 दिवस ती काम करत होती. इतक्या वेदना आणि अडचणी असूनही अर्चनाने हार मानली नाही. तिने कधीच तक्रार केली नाही. वयाच्या 60 व्या वर्षी तिने युट्यूब चॅनल सुरु केलं आणि नवीन गोष्टी ट्राय केल्या, जी एक चांगली गोष्ट आहे,” हे ऐकताच अर्चनाच्या डोळ्यात पाणी आलं. अर्चनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. ‘जलवा’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘मोहब्बतें’, ‘कुछ कुछ होता है’ यांसारख्या सिनेमांमधील तिच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे. हेही वाचा: तृणमूल काँग्रेस ईडीविरुद्ध मैदानात; ममता बॅनर्जींनी नेमके काय केले आरोप?