Ahana deol: धर्मेंद्र यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, तेव्हा त्यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. सिनेसृष्टीत आल्यानंतर त्यांची भेट अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी झाली आणि दोघांनी 1980 साली विवाह केला. त्यांच्या दोन मुलींमध्ये ईशा आणि अहाना देओल यांचा समावेश आहे. ईशाने काही चित्रपटांत काम केले असले, तरी अहाना कायमच ग्लॅमरपासून दूर राहिली आहे. अहानाने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांबद्दल काही सुंदर आठवणी सांगितल्या. “मी सहा वर्षांची होते…” – अहानाची गोड आठवण अहाना म्हणाली, “मी सहा वर्षांची होते. बाबा लोणावळ्यात त्यांच्या शेतात जाणार होते. ते निघताना मला फक्त सांगायला आले. मी अचानक म्हणाले मी पण येणार! त्यांनी लगेच माझी बॅग भरली आणि मला सोबत नेलं. कारमध्ये मला त्यांच्या मांडीवर बसवलं. तो माझ्या आयुष्यातील सर्वात गोड आणि जवळचा क्षण आहे.” आई-वडिलांचे रोमॅंटिक सीन पाहिल्यावर काय वाटायचे? अहाना हसत म्हणाली, “जेव्हा बाबा पडद्यावर इतर अभिनेत्री सोबत रोमॅंटिक सीन करायचे, ते मला अजिबात आवडायचं नाही. मी गोंधळायची, रागही यायचा. माझी आई मला समजवायची. पण सुरुवातीला हे पाहणे माझ्यासाठी खूप अवघड होतं.” “वडिलांनी मला नेहमीच प्रेम करायला शिकवलं” अहाना पुढे म्हणते, “माझ्या वडिलांनी मला प्रेम, आपुलकी आणि संवेदनशीलता शिकवली. आनंदी राहणे, निरोगी राहणे आणि आतून मजबूत रहाणे हेच त्यांनी नेहमी सांगितले. त्यांचे शिकवण साधे वाटत असले तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे.” धर्मेंद्र यांच्याकडून वारशात काय मिळालं तर आवडेल? या प्रश्नावर अहाना अगदी मनापासून म्हणाली, “मला बाबांची पहिली कार, त्यांची जुनी Fiat वारशाने मिळाली तर मला खूप आनंद होईल. त्या कारशी त्यांच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. ती माझ्याकडे राहिली तर माझ्यासाठी त्यापेक्षा मौल्यवान वस्तू दुसरी नाही.” ईशा देओलचाही अनुभव ईशा देओलनेही एकदा सांगितले होते की, धर्मेंद्र यांचा रणजीत यांच्यासोबतचा एक अॅक्शन सीन ती पाहत होती. रणजीत धर्मेंद्र यांना स्क्रीनवर मारत होते. ते पाहून ईशा रडू कोसळली. तिला पाहताच धर्मेंद्र यांनी शूटिंग थांबवले आणि तिला हॉटेलवर परत पाठवले. तसेच ईशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती चित्रपटात काम करणार हे वडिलांना सुरुवातीला अजिबात आवडत नव्हते. ते तिला 18 वर्षांची झाल्यावर लग्न करावे, असे म्हणत असत. मात्र नंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला.