Imran Khan : बॅालीवूड अभिनेता आमिर खानचा भाचा अभिनेता इम्रान खान सध्या चर्चेत आहे. गेल्या ११ वर्षांनंतर अभिनेता इंडस्ट्रीपासून दूर होता, पण आता तो पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. या काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतार आले. याविषयी अभिनेत्याने सर्वकाही स्पष्ट केले आहे. हॅपी पटेल या चित्रपटातून इम्रान खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मानसिक तणाव, बायको अवंतिका मलिकसोबतचा घटस्फोट, सिंगल पेरेंट म्हणून असणारी जबाबदारी या सगळ्या गोष्टींशी तो डील करत आहे. दरम्यान, त्याने एका मुलाखतीत पत्नी अवंतिकासोबत्याच्या घटस्फोटामागचे कारण सांगितले आहे. 2016 मध्ये काहीतरी गडबड असल्याची पहिल्यांदा जाणीव झाली. तेव्हा मी अजून अवंतिकासोबत राहत होतो. मी एका भीतीने आणि चिंतामणात धरून जगाशी संवाद साधत होतो. तेव्हा मला वाटायचं मी शांत आहे. पण आतून मी पूर्णतः तुटलो होतो, अशी वेदाना देणारी आठवण इम्रानने सांगितली. पुढे बोलताना तो म्हणाला, जेव्हा मी विचार केला तेव्हा जाणवलं की मी माझी जी इमेज घेऊन जगतोय ती खरी नाही. मला ती बदलायची होती. 2016 मध्ये मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करण्यास सुरुवात केली. याच काळात मला जाणवलं की पत्नीसोबत असणार माझं नातं अस्वस्थ आहे. मला जाणवलं की स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी मला ह्या नात्यातून बाहेर पडावे लागेल. स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी, उपचारांसाठी मी पत्नीकडून घटस्फोट घेतला, असल्याचे पहिल्यांदाच अभिनित्याने मुलाखतीत सांगितले. घटस्फोटाचा दोष मी कोणालाही देत नाही, असे देखील इम्रानने स्पष्ट केले आहे. जाने तू या जाने ना, आय हेट लव स्टोरी, गोरी तेरे प्यार या चित्रपटांनी इम्रानला ओळख मिळवून दिली. हेही वाचा : Shashi Tharoor Son Ishaan Job: शशी थरूर यांच्या मुलाची नोकरी गेली ; वॉशिंग्टन पोस्टच्या कर्मचारी कपातीत ईशानचा लागला नंबर