AIद्वारे तयार केलेल्या व्हिडिओंवर आता ‘लेबल’ असणे बंधनकारक; केंद्र सरकार लवकरच नवी नियमावली आणणार

नवी दिल्ली – विविध समाज माध्यमावर सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआयचा वापर करून व्हिडिओ आणि इतर माहिती प्रसारित केली जाते. त्यामुळे अनेकांची दिशाभूल होते. त्याचबरोबर गुन्हेगारीही वाढत आहे. आता केंद्र सरकारने एआयचा वापर करून एखादा व्हिडिओ तयार केला असेल तर त्यावर तसे लेबल असणे बंधनकारक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विविध उद्योग क्षेत्रासोबत यासंदर्भात साधक बाधक चर्चा पूर्ण केली आहे. लवकरच नवीन नियमावली जाहीर केली जाईल असे माहिती तंत्रज्ञान सचिव एस कृष्णन यांनी सांगितले.
एखादे वृत्त किंवा व्हिडिओ जबाबदारीने प्रकाशित केला जावा असा यामागे दृष्टिकोन आहे. उद्योग क्षेत्राने याला कसलाही विरोध केलेला नाही. सर्वसाधारण व्हिडिओ आणि एआयचा वापर करून तयार केलेला व्हिडिओ यातील फरक पाहणार्याला कळवा असा यामागे दृष्टिकोन आहे.
इतर मंत्रालयाबरोबरही यासंदर्भात चर्चा चालू असून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एआयचा वापर तयार करून केलेली माहिती स्पष्ट स्वरूपात पाहणार्याला मिळावी. यामध्ये कोणावर बंधन आणण्याचा प्रयत्न नाही. फक्त त्यावर लेबल लावण्याचा आमचा विचार आहे असे ते म्हणाले.





