Q3 results 2026: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने शनिवारी आपला तिसर्या तिमाहिचा ताळेबंद जाहीर केला. या ताळेबंदातील माहितीनुसार एचडीएफसी बँकेचा नफा यातही 12 टक्क्यांनी वाढून 19,807 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी यात तिमाहीत बँकेला 17,657 कोटी रुपयाचा नफा झाला होता. तर सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसर्या तिमाहीत बँकेला 18,653 कोटी रुपयाचा नफा झाला होता. म्हणजे तिमाही आणि वार्षिक पातळीवर या बँकेचा नफा वाढला. बँकेने सांगितले की, नव्या कामगार संहिताच्या अंमलबजावणीसाठी बँकेला आठशे कोटी रुपयाचा खर्च आला आहे. आगामी काळात हा खर्च होणार नाही. बँकेचे व्याजातील उत्पन्न 6.4 टक्क्यांनी वाढून 32,600 कोटी रुपये इतके झाले आहे. जे की गेल्या वर्षी या तिमाहित 13,250 कोटी रुपये इतके होते. दरम्यान खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनेही तिसर्या तिमाहीचा ताळेबंद जाहीर केला असून या तिमाहित बँकेचा नफा 2.6 टक्क्यांनी कमी होऊन 12,238 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत बँकेला 12,883 कोटी रुपयाचा नफा झाला होता. तर सप्टेंबरअखेर संपलेल्या तिसर्या तिमाहित बँकेला 13,537 कोटी रुपयांचा नफा झाला होता. म्हणजे वार्षिक आणि तिमाही पातळीवर बँकेच्या नफ्यात घट झाली आहे. बँकेला खराब कर्जापोटी 2,556 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. त्याचबरोबर कामगार संहिताच्या अंमलबजावणीसाठी 145 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली. कृषी क्षेत्रातला दिलेल्या कर्ज पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे बँकेला जास्त तरतूद करावी लागली आहे. दरम्यान येस बँकेने जाहीर केलेल्या ताळेबंदातील माहितीनुसार तिसर्या तिमाहित बँकेचा नफा 55 टक्क्यांनी वाढून 952 कोटी रुपये इतका झाला आहे. जोकी गेल्या वर्षी या तिमाही 612 कोटी रुपये इतका होता. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत या बँकेचा नफा 654 कोटी रुपये इतका होता. म्हणजे वार्षिक आणि तिमाही पातळीवर या बँकेचा नफा वाढला आहे. या तिमाहीत बँकेची ढोबळा अनुत्पादक मालमत्ता कमी होऊन 0.10 टक्के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी ही अनुत्पादक मालमत्ता 1.5% होती. त्यामुळे या तिमाहीत कंपनीला कमी तरतूद करावी लागली. यामुळे नफा वाढण्यात मदत झाली.