पुणे – भारताच्या रिटेल क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक ब्रँड म्हणून नावाजलेल्या पु. ना. गाडगीळ आणि सन्सने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रगती सिद्ध केली आहे. देशातील सर्वात मानाच्या यादींपैकी एक असलेल्या र्ऋेीीींपश 500 खपवळर यादीत तिसर्यांदा स्थान मिळवण्याचा बहुमान कंपनीने प्राप्त केला आहे. 2021, 2024 आणि आता 2025 या तिन्ही वर्षांत सलग मिळालेल्या मानांकनांनी पु. ना. गाडगीळ आणि सन्सची आर्थिक बळकटी, व्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि ग्राहकांचा अबाधित विश्वास यांची ठाम पुष्टी केली आहे.2025 मधील ठरपज्ञ 289 हा क्रमांक केवळ एक आकडा नाही; तर हा ग्राहकांनी दाखवलेल्या प्रेमाचा, आमच्या टीमने दिलेल्या अथक सेवेचा आणि ब्रँडच्या 193 वर्षांच्या सुवर्णवारशाचा गौरव आहे. सोने, चांदी आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या क्षेत्रात पु. ना. गाडगीळ आणि सन्स ने सातत्याने नवनवीन संकल्पना, प्रामाणिकता आणि अद्वितीय ग्राहक अनुभव यांच्या आधारे देशभरात स्वतःची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. पु ना गाडगीळ आणि सन्सचे मुख्य प्रवर्तक अजित गाडगीळ यांनी आम्ही हा ऐतिहासिक यशाचा क्षण आमच्या सर्व ग्राहक, कर्मचारी, पुरवठादार, भागीदार आणि समर्थक यांना समर्पित करतो. तुमच्या विश्वासामुळेच आज पु. ना. गाडगीळ आणि सन्स भारतातील सर्वात प्रभावी आणि प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये गणली जाते. ही कामगिरी आमची नाही- ती आपल्या सर्वांची आहे, अशा भावना व्यक्त केल्या.