Maruti Suzuki Q3 Results: भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माण करणारी कंपनी मारुती सुझुकी इंडियाला तिसऱ्या तिमाहीतील नफा चार टक्क्यांनी वाढून 3,879 कोटी रुपये इतका झाला आहे. कंपनीला नव्या कामगार संहिताच्या अंमलबजावणीसाठी 594 कोटी रुपयांची तरतूद करावी लागल्यामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत कंपनीच्या शेअरचा भाव बुधवारी 1.69 टक्क्यांनी कमी होऊन 14,983 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेला होता. कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार या तिमाहीत कंपनीचा महसूल वाढून 49,904 कोटी रुपये झाला आहे. जो की गेल्या वर्षी 38,764 कोटी रुपये इतका होता. कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कराव्या लागत असलेल्या तरतुदीमुळे कंपनीच्या नफ्यात महसुलाच्या प्रमाणात वाढ होऊ शकली नाही. विशेष म्हणजे यात तिमाहीत जीएसटी कपातीमुळे कंपनीची विक्री 5.64 लाख युनिट या विक्रमी पातळीवर गेली होती. गेल्या वर्षी या तिमाहीत कंपनीचे विक्री केवळ 4.66 लाख युनिट एवढी होती. मात्र तरीही या तिमाहेत कंपनीच्या नफ्यात केवळ चार टक्क्याची वाढ झाली आहे. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत कंपनीची विक्री विक्रमी पातळीवर म्हणजे 17.46 युनिट झाली. जी की गेल्या वर्षी या कालावधीत 16.29 युनिट होती. हेही वाचा – Startups: स्टार्टअपची व्याख्या बदलणार; डीप टेक, सहकारसह इतर क्षेत्रांना लाभ, देशातील स्टार्टअप्सची संख्या वाढणार