नवी दिल्ली: वर्षाचा शेवटचा महिना, डिसेंबर सुरू आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत काही महत्त्वाची कामे पूर्ण करणे सामान्य नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. ही कामे वेळेत पूर्ण न केल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, इतकेच नाही तर दंड देखील भरावा लागेल. १. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख – पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. प्रत्येक नागरिकाने ३१ डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. लिंक न केल्यास आर्थिक व्यवहार थांबतील. पॅन कार्ड निष्क्रिय होईल ज्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होईल. आयटीआर फाईल करणे कठीण होईल. आयकर विवरणपत्र (ITR) फाईल करताना अडचणी येतील. रिफंड अडकेल, तुमचा आयटीआर रिफंड (परतावा) देखील थांबवला जाईल. २. बिलेटेड ITR फाईल करण्याची अंतिम तारीख – जर तुम्ही अजूनही तुमचे बिलेटेड ITR (विलंबित आयकर विवरणपत्र) फाईल केले नसेल, तर हे काम लवकरात लवकर पूर्ण करा. मुदतीनंतर फाईल न केल्यास रिफंड मिळणार नाही. लेट फी आणि व्याज लागेल. दरम्यान, वर्षाच्या शेवटच्या दिवसापूर्वी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही दोन महत्त्वाची कामे न केल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो आणि सरकारी सुविधांचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी त्वरित ही कामे पूर्ण करावीत, असे आवाहन करण्यात येत आहे.