Anil Ambani : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) मोठी कारवाई केली. त्यानुसार, उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि इतर कंपनीशी संबंधित 3,034 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे रिलायन्स अनिल अंबानी (Anil Ambani) समूहाच्या (आरएएजी) अडचणीत मोठी वाढ झाली असून, आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या एकूण मालमत्तेचा आकडा १९,३४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जप्त करण्यात आलेल्या या मालमत्ता रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (आर-इन्फ्रा) यांच्याशी संबंधित आहेत. Anil Ambani यामध्ये मुंबईतील एक आलिशान फ्लॅट, खंडाळ्यातील एक फार्महाऊस, महाराष्ट्रातील एका हिल स्टेशनवरील मालमत्ता, अहमदाबादमधील साणंद येथील जमिनीचे भूखंड आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे ७.७१ कोटी शेअर्स यांचा समावेश आहे. ईडीने या मालमत्तांच्या जप्तीसाठी तात्पुरता आदेश जारी केला आहे. अनिल अंबानी (Anil Ambani) यांचा समूह सध्या बँक फसवणूक आणि निधीचा गैरवापर (डायव्हर्जन ऑफ फंड्स) यांसारख्या गंभीर आरोपांखाली ईडीच्या तपासाला सामोरे जात आहे. कंपन्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचा वापर योग्य कामासाठी न करता तो इतरत्र वळवल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या प्रकरणातील चौकशीचा भाग म्हणून ईडीने ही नवी जप्तीची कारवाई केली आहे.