Adani Group Shares: भ्रष्टाचारासंदर्भातील प्रकरणात अमेरिकेच्या शेअर बाजार नियंत्रकांनी अमेरिकेतील न्यायालयाकडे अदानी समूहातील गौतम अदानी आणि सागर अदानी यांना ई-मेलच्या माध्यमातून थेट समन्स पाठविण्याची परवानगी मागितली आहे. या घडामोडीनंतर अदानी समूहातील शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली. काय आहे प्रकरण? प्राप्त माहितीनुसार अमेरिकेच्या शेअर बाजार नियंत्रकांनी न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथील न्यायालयाला सांगितले की, भ्रष्टाचारा संदर्भातील चौकशीसाठी अदानी यांची चौकशी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तींना समन्स पाठविण्याबाबत भारतातील अधिकारी सहकार्य करत नाहीत. अशा परिस्थितीत गौतम अदानी व सागर अदानीे यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविण्याची परवानगी मिळावी असे सांगितले. नोव्हेंबर 2024 मध्ये अमेरिकेतील न्यायालयात गौतम अदानी आणि सागर अडाणी यांनी अमेरिकेतील शेअर बाजारासंदर्भातील नियमांचा भग केला असल्याचा आरोप केला आहे. अदानी समूहाने आरोप फेटाळले – अदानी ग्रीन एनर्जी संदर्भात या दोघांनी दिशाभूल करणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप आरोपही करण्यात आलेला आहे. या आरोपाची चौकशी अमेरिकेतील बाजार नियंत्रण करीत आहेत. मात्र या आरोपाचा अदानी समूहाने इन्कार केलेला आहे. सोलर पॉवर कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी कुठल्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करण्यात आला नसल्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे. सर्व काम नियमानुसार करण्यात आले असून आमच्या विरोधात आधारहीन आरोप करण्यात येत असल्याचे अदानी समूहाने वेळोवेळी सांगितले आहे. त्याचबरोबर यासंदर्भात अदानी समुहाने न्यायालयात आपली बाजू मांडण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आता अदानी समुहाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अमेरिकेतील न्याय विभाग, शेअर बाजार नियंत्रकांनी, अदानी ग्रीन एनर्जीच्या संचालका विरोधात केलेले आरोप आधारही असून आम्ही या आरोपाचा इन्कार करतो. तिसऱ्या तिमाहीत असमाधानकारक कामगिरी विश्लेषकानी सांगितले की, तिसर्या तिमाहीचे अदानी समूहातील बर्याच कंपन्यांनी ताळेबंद जाहीर केले आहेत. त्या ताळेबंदामध्ये अपेक्षेइतका नफा वाढलेला नाही. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी शेअरची विक्री करून नफा काढून घेण्याचे ठरविले. त्यातच या समूहाबद्दल अमेरिकेत चौकशी होणार असल्याचे पुन्हा दिसून येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जोखीम टाळली आहे. या अगोदरही अशाच प्रकारामुळे अदानी समूहाचे शेअर गेल्या काही वर्षात कोसळले होते. मात्र त्यानंतर ही झीज भरून निघाली असतानाच पुन्हा अदानी समूहाबाबत अमेरिकेतील घडामोडीमुळेे नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. कंपनींच्या शेअर्समध्ये मोठी घट – -अदानी एंटरप्राइजेस 9.38% -अदानी पॉवर 8.84% -अदानी पोर्ट्स 7.81% -अदानी टोटल गॅस 7.5 % -अदानी ग्रीन एनर्जी 13.20% -अदानी एनर्जी सोल्युशन 10.57% -अंबुजा सिमेंट 5.98% -सांघी इंडस्ट्रीज 5.96% -एनडीटीव्ही 5.31% -एससीसी 2.76% हेही वाचा – Share Market Falls: शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’; सेन्सेक्स 770 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटींचे नुकसान