वाघोली – आमदार बापूसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकाऱ्यांसोबत लोहगावमध्ये पाहणी दौरा केला. लोहगाव-वाघोली रस्त्यावरील जगद्गुरु कॉलनी, योजनानगर भागातील ड्रेनेज, पाणी, रस्ता याबाबत पाहणी केली. उपस्थित नागरिक बांधवांनीही विविध समस्या मांडल्या. पाहणीनंतर अधिकाऱ्यांसमवेत महापालिकेच्या संपर्क कार्यालयात बैठक घेतली व समस्यांवर उपाययोजना करण्याच्या सूचना करत सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांचा कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी नगरसेवक रामदास दाभाडे, अनिल सातव, डॉ. श्रेयस खांदवे, ऐश्वर्या पठारे,मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, कार्यकारी अभियंता विशाल हरिभक्त, युवराज हांडे, कनिष्ठ अभियंता सिद्राम पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता शुभम घाटकर, पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील पोपळे, विभागीय आरोग्य निरीक्षक श्रीमती धनश्री जगदाळे, आरोग्य निरीक्षक गोपाळ नायडू, प्रीतम खांदवे, राजेंद्र खांदवे, दासआप्पा खांदवे तसेच नागरिक बांधव उपस्थित होते. “लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्वच जण लोहगावच्या विकासासाठी सज्ज आहोत. येणाऱ्या काळात लोहगावचा निश्चितपणे सकारात्मक कायापालट झालेला दिसेल.” – रामभाऊ दाभाडे, नगरसेवक मनपा पुणे