पुणे : गुरूवारी (दि.१५) महापालिका निवडणूकीसाठी मतदान आहे. त्यामुळे मार्केट यार्ड व उपबाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, तसेच ग्राहकांनी खरेदीसाठी येऊ नये, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे सभापती प्रकाश जगताप आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी केले आहे. मार्केट यार्डातील मुख्य बाजारातील फळ, भाजीपाला, गुळ-भुसार, केळी, फुल आणि पान बाजार, पेट्रोल पंप, वजनकाटा विभाग, तर मोशी, पिंपरी, खडकी, मांजरी आणि उत्तमनगर येथील उपबाजार बंद राहणार आहेत.