पुणे : अवघ्या वीस रुपयांत प्रवासाची सोय उपलब्ध करून देत खिशावरील भार हलका केल्याचे श्रेय सामान्य पुणेकर भारतीय जनता पक्षाला देतात. नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करणारे जवळपास १० लाख नागरिक पीएमपीएमएलच्या स्वस्तातील बससेवेचा लाभ घेतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर असताना महापालिकेने पीएमपीएमएल सुधारण्यासाठी विशेष लक्ष दिले नव्हते. त्यामुळे सतत बंद पडणाऱ्या बस, रस्त्यावर ताटकळणारे प्रवासी हे चित्र पुण्यात होते. २०१४ नंतर सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांची सार्वजनिक बससेवा सुधारण्यास प्राधान्य दिले. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यानंतर डिझेलच्या बस बाद करून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस (e-buses) ताफ्यात आणल्या. असा धोरणात्मक निर्णय घेणारी पुणे ही देशातली पहिला महापालिका ठरली. नव्या, वातानुकूलित बसमुळे सामान्य पुणेकरांना आरामदायी, प्रदूषणमुक्त प्रवास स्वस्तात करता येऊ लागला. बस संख्या वाढल्याने गर्दी नियंत्रणात आली असून बसफेऱ्याही वाढल्या आहेत. पाच रूपयांत पाच किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी ३९अटल बससेवा सुरु करण्याचा निर्णय भाजपने घेतला. दहा रुपयांत ३९ पुण्य दशम सेवा उपलब्ध करून दिली. स्वारगेट, डेक्कन, शिवाजीनगर, पुणे स्टेशन आणि महात्मा गांधी बस स्टँड (पुलगेट) या मध्य पुण्यातल्या नऊ मार्गांवरून पुण्य दशम बस धावतात. याचा फायदा नोकरदार, व्यावसायिक, मध्यमवर्गीय, महिला, विद्यार्थी तसेच कष्टकरी पुणेकरांना होतो आहे. अवघ्या पाच-दहा रुपयांत प्रवास करता येऊ लागल्याने लाखो सामान्य पुणेकर भाजपला दुवा देत आहेत. अकरा वर्षांतील जादू पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात सध्या दोन हजार बस आहेत. यात १,३२८ सीएनजी, ४९० इलेक्ट्रिक आणि २१७ डिझेल बस आहेत. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील डिझेलवर धावणाऱ्या बस डिसेंबर २०२५ अखेर पूर्णतः हद्दपार करण्याचे धोरण भाजपचे आहे. त्यासाठी सातत्याने पुण्याला सीएनजी-इलेक्ट्रिक (e-buses) बस दिल्या गेल्या. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने होणारे वायू प्रदूषण पूर्णपणे बंद होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने पुण्याला दोन हजार पर्यावरणपूरक बसगाड्या देण्याचा निर्णय नुकताच घेतला. यात एक हजार सीएनजी आणि १,००० इलेक्ट्रिक बस असतील. यामुळे पुण्यातील प्रदूषण तर कमी झाले. शिवाय, सर्वसामान्य, कष्टकरी, नोकरदार, सामान्य पुणेकर, विद्यार्थी-महिलांना सक्षम, जलद वाहतूक पर्याय उपलब्ध झाला आहे. -केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ