प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात फारसा बदल झाला नसला तरी कमाल तापमानात एक-दोन अंशाने घट झाली आहे. किमान तापमान १३ अंशावर स्थिर असल्यामुळे पहाटे आणि रात्री थंडी जाणवत आहे. विशेषत: डोंगर, धरणक्षेत्रात परिसरात थंडीचा जोर जाणवत आहे. पहाटे धुक्यांची चादर आणि बोचऱ्या थंडीने गारठा वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात सतत घट होत असल्याने गायब झालेल्या थंडीची पुन्हा चाहूल लागली. १७ ते १८ अंशाच्या पुढे गेलेले किमान तापमान आज (दि. २८) १३ अंशापर्यंत खाली आले. परिणामी जिल्ह्यातील बहुतांश भागात तसेच शहर परिसरातील हेवेली, एनडीए, पाषाण, कात्रज, धायरी, खडकवासला, सिंहगड रस्ता, हांडेवाडी परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. सलग दोन दिवस किमान तापमानात घट झाली तरी गेल्या २४ तासात किमान तापमानात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे पहाटे धुके आणि थंडी जाणवत आहे. कमाल तापमान घटत असल्याने दुपारी उन्हाने दिलासा दिला. ३२ अंशापर्यंत पोहचलेले कमाल तापमान २९ अंशापर्यंत खाली आल्याने रात्रीही थंडीचा जोर जाणवत आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील किमान व कमाल तापमानात् फारसा बदल होणार नसून, आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान पाषाण १४.४, शिवाजीनगर १५, कोरेगांव पार्क १८.३, चिंचवड १८.८, मगरपट्टा १९.९ आणि वडगांवशेरी २०.२, माळीण १३.९, हवेली १४.२, तळेगांव दाभाडे, बारामती १५.४, आंबेगांव १५.५, दौंड १५.५, भोर १६.७