कोथरूड – जनसंपर्क कार्यालयातून जनतेचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील. त्याचबरोबर पक्षवाढीसाठी हे कार्यालय महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. बावधनचे माजी सरपंच राहुल दुधाळे यांच्या भुसारी काॅलनी-बावधन प्रभाग १० मध्ये सुरू केलेल्या शिवसेना (उबाठा) जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख व आमदार सचिन अहिर, जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, सुरेश भोर, शहरप्रमुख गजानन थरकुडे, युवासेनचे अविनाश बलकवडे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका स्वाती ढमाले, बावधनचे माजी सरपंच बबनराव दगडे, सुदाम भुंडे, राजेंद्र भुंडे, तानाजी दगडे, बापूसाहेब पाडाळे, प्रदीप वाघमारे, अशोक भुंडे, भाऊसाहेब दगडे, प्रदीप दगडे, नितीन दगडे, दत्तात्रय दगडे, हरिश्चंद्र दुधाळे, प्रदीप बडे, अशोक मोकाशी, किरण कुडापणे, काशिनाथ दगडे, तुकाराम दगडे, महेश दगडे, अनिल दगडे, चंद्रकांत दगडे, दिलीप दगडे आदी उपस्थित होते. यावेळी जुन्नर तालुक्यातील उद्योजक रमेश म्हेत्रे यांनी ठाकरे यांच्या हस्ते ‘शिवबंधन’ बांधून प्रवेश केला. २००२ ते २००७ या पाच वर्षांत राहुल दुधाळे यांनी बावधन ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम केले. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, बंदिस्त ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावला. बंदिस्त सांडपाणी वाहून नेणारी पहिली योजना दुधाळे यांच्या काळात सुरू झाली. गावातील विविध सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी त्यांनी आंदोलने, मोर्चे काढत प्रश्न सोडविले.