हडपसर – स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे यांच्या नेतृत्वाखाली शितळादेवी माता मंदिरात नारळ फोडून प्रभाग क्र. १७ मधील भाजप उमेदवार खंडू सतीश लोंढे, शुभांगी किरण होले-शिवरकर, पायल विराज तुपे व प्रशांत वसंतराव तुपे यांच्या प्रचारास उत्साहात सुरुवात करण्यात आली. यानंतर माळवाडी वीटभट्टी येथून प्रचार पदयात्रा काढण्यात आली. या वेळी तुपे, झेंडे, होले, ससाणे, लोंढे, शिवरकर, मगर आदी कुटुंबांतील ज्येष्ठ नागरिक तसेच बाबा शिवरकर, नितीन तुपे, संजय आरू, नामदेव होले, अरुण मगर, राहुल होले यांच्यासह लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. रवी शंकर तुपे यांच्या समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. उमेदवारांनी घराघरांत जाऊन संवाद साधत पारदर्शक, उत्तरदायी व सर्वसमावेशक विकासाची ग्वाही दिली. वीटभट्टी, काळुबाई वसाहत व साने गुरुजी वसाहत परिसरात महिलांनी औक्षण केले, तर नागरिकांनी फुले उधळून स्वागत केले. आगामी काळात सक्षम व नियोजनबद्ध कारभार केला जाईल, असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.