प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रवाशांची वाढती गर्दी लक्षा घेता मध्य रेल्वेने पुणे ते प्रयागराज एकेरी तीन रेल्वे विशेष शुल्कावर चालविणार आहे. ट्रेन क्रमांक ०१४०५ पुणे – प्रयागराज एकेरी विशेष गाडीचे ४ आणि ५ डिसेंबर रोजी पुण्यातून ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. ती ६ आणि ७ डिसेंबरला दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी पोहचेल. या गाडीला हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, मैहर, सतना आणि माणिकपूर याठिकाणी थांबे दिले आहे. ही गाडी एकूण २० आयसीएफ कोच असून, त्यामध्ये १२ स्लीपर क्लास, ६ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.