पुणे : शहराच्या राजकारणातील आकर्षणाच केंद्रबिंदू राहिलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग २३ (रविवार पेठ- नाना पेठ) आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. या प्रभागातून सर्वसाधारण महिला गटातून भाजपकडून ॠतुजा तेजस गडाळे यांना उमेदवारी देत एक तरुण सुशिक्षित चेहरा पुढे आणला असून, ॠतुजा यांच्या उमेदवारीमुळे भाजपला या प्रभागात बळ मिळाले आहे. ॠतुजा या माजी नगरसेविका सुनंदाताई सतीश गडाळे यांच्या सूनबाई आहेत. या परिसरात सुनंदाताईंची नगरसेवक म्हणून कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्यांनी कित्येक वर्षांपासून जगदंबा महिला विविध सहकारी संस्थेच्या माध्यमातून हजारो दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर करण्याचे कार्य सुरू आहे. हा वारसा ॠतुजा यांच्या माध्यमातून पुढे सक्षमपणे चालविला जाणार आहे. ॠतुजा यांचे पती तेजस पहिल्यापासूनच प्रभागात सक्रिय आहेत, तसेच ते भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम करत असल्याने या प्रभागातील भाजपचे उमेदवार पल्लवी जावळे, अनुराधा मंचे, विशाल धनवडे या उमेदवारांना ॠतुजा यांच्या उमेदवारीने बळ मिळाले आहे.गडाळे कुटुंबाचे व्यापारी, व्यावसायिक क्षेत्रात चांगले संबंध आहेत. या सगळ्याचा विचार करून भाजप पक्षश्रेष्ठींनी सगळेच गेमचेंजर उमेदवार देत प्रभागातील सगळ्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिल्याची चर्चा प्रभागात असून, योग्य उमेदवार निवडीने मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.