प्रभात वृत्तसेवा पुणे – महामेट्रोने मंडई, नळस्टॉप आणि आयडीयल कॉलनी मेट्रो स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.आता मंडई मेट्रो स्थानकाचे नाव महात्मा फुले मंडई स्थानक, नळस्टॉप स्थानकाचे नाव एसएनडीटी महाविद्यालय, आणि आयडियल कॉलनी मेट्रो स्थानकाचे नाव पौड फाटा मेट्रो स्थानक असे केले आहे. आता पुढील काही दिवसांत स्थानकांच्या फलकांमध्येही बदल केला जाईल. मंडई मेट्रो स्थानकाचे नाव महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक असे करावे अशी मागणी माळी महासंघाने लावून धरली होती. यासाठी त्यांनी अनेकदा धरणे, उपोषण केले होते. नळस्टॉप व आयडियल कॉलनी स्थानकांच्या नावामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचे काही संघटनांचे म्हणणे होते. मेट्रो स्थानकांच्या नव्या नामकरणावर केंद्राने शिक्कामोर्तब केले आहे.