पुणे – प्रचाराच्या धामधुमीत रविवारच्या सुट्टीचा दिवसाची संधी साधत प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ – पर्वतीमधील भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांनी दत्तवाडी परिसरात पदयात्रा काढली. या पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पदयात्रेमध्ये नागरिकांनी भाजपाचे उमेदवार महेश ऊर्फ अमर आवळे यांचे व इतरांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. एका सामान्य कुटुंबातील उमेदवाराला पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट दिल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दत्तवाडीतील मांगीरबाबा चौकातून दुपारी साडेचार वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष सहभागी झाले होते. दत्तवाडीतील रक्षालेखा सोसायटी, प्रियदर्शिनी या भागातील नागरिकांनी घराबाहेर येऊन या पदयात्रेचे स्वागत केले. स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. रविवारी सकाळी लक्ष्मीनगर तसेच म्हाडाच्या वसाहतीमध्ये घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळीही नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले. यावेळी प्रभागातील विविध प्रश्न आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रचाराला सुरुवात झाल्यापासून भाजपाच्या पॅनलने प्रचारात आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसापासून प्रभागातील पर्वती दर्शन, राजेंद्र नगर, लक्ष्मीनगर या भागात पदयात्रा काढण्यात आल्या आहेत. या सर्व पदयात्रांना स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.