हडपसर – प्रभाग क्र. १७ मध्ये भारतीय जनता पक्षाने सुशिक्षित, तरुण व दमदार उमेदवार देत नागरिकांसमोर एक सक्षम राजकीय पर्याय उभा केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागाचा विकास रखडला होता. आता, भाजपच्या माध्यमातून हडपसरच्या विकासाला गती मिळत असून अनेक रखडलेली विकासकामे मार्गी लागत आहेत. भविष्यात प्रभाग स्वच्छ, सुंदर व सुनियोजित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचेच सर्व उमेदवार विजयी करावेत, असे आवाहन उमेदवारांनी नागरिकांना केले. रामटेकडी-माळवाडी-वैदूवाडी प्रभाग क्र. १७ मधील भाजप-आरपीआयचे अधिकृत उमेदवार खंडू सतीश लोंढे, शुभांगी किरण होले-शिवरकर, पायल विराज तुपे व प्रशांत उर्फ मामा वसंतराव तुपे यांच्या प्रचारार्थ माळवाडी परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उमेदवारांनी घरोघरी भेट देत मतदारांशी थेट संवाद साधला. या पदयात्रेत संतोष अण्णा खरात, रवि शंकर तुपे, सोमनाथ आबनावे, अशोक लाकडे, कान्हा देडे, लखन कांबळे, विनोद खवले, सोनाली कोद्रे यांच्यासह भाजप, आरपीआय व विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, संदीप नाना भानुदास तुपे, बाळासाहेब हिंगणे व गणेश फुलारे या सक्षम राजकीय पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. आरपीआय आठवले गट व भटके-विमुक्त समाजाचा लक्षणीय पाठिंबा भाजप उमेदवारांना मिळत आहे. फोटो – हडपसर : प्रभाग क्र. १७ मध्ये भाजपच्या उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला.