प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी पुणे शहर भाजप माध्यम कक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर या वेळी उपस्थित होते. आगामी मनपा निवडणूक अनुषंगाने पुणे भाजप मीडिया सेंटर सुरू करण्यात आले असल्याचे खासदार मोहोळ यांनी स्पष्ट केले.