पुणे – भारतातील सर्वाधिक विश्वासार्ह वारसाहक्क लाभलेला दागिन्यांचा ब्रँड पीएनजी ज्वेलर्स पुन्हा एकदा आपल्या बहुप्रतिक्षित चेन अँड बँगल्स महोत्सव सुरु केला आहे. 5 जानेवारी 2026 पासून देशभरातील सर्व पीएनजी ज्वेलर्स शोरूम्समध्ये हा महिनाभराचा महोत्सव सुरु झाला आहे. पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, भारतीय विवाहसंस्कृतीत चेन आणि बांगड्यांना विशेष स्थान आहे. हे दागिने वारसा म्हणून पुढील पिढ्यांकडे सुपूर्द केले जातात आणि विश्वास व सातत्याचे प्रतीक देखील मानले जातात. पीएनजी ज्वेलर्समध्ये असलेले मूल्य, वैविध्य आणि उत्कृष्ट कारागिरी यांचा संगम साधण्याची आमची बांधिलकी या महोत्सवातून दिसून येते. महोत्सवाच्या अंतर्गत, ग्राहकांना सोन्याच्या चेन आणि बांगड्यांवर प्रति ग्रॅम रुपये 515 इतकी थेट मेकिंग चार्ज सवलत मिळणार आहे. यासोबतच, हिर्याच्या बांगड्यांच्या मेकिंग चार्जवर थेट 50 टक्के सूट देण्यात येत आहे. ही ऑफर 5 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत सर्व पीएनजी ज्वेलर्स शोरूम्समध्ये वैध असेल. या महोत्सवात दैनंदिन वापरासाठी लागणारे दागिने, भेटवस्तू किंवा खास प्रसंगांसाठी अनुरूप अशा उत्तम दर्जाच्या सोन्याच्या चेन, आकर्षक बांगड्या तसेच हिर्यांच्या बांगड्यांचा समावेश आहे. उत्कृष्ट कारागिरी आणि दीर्घकाळ टिकणारी डिझाईन्स असलेले दागिने ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.